यार्ड हे लांबी मोजण्याचे एक एकक आहे जे इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. हे एकक वापरण्याची नेमकी सुरूवात कधी झाली ते सांगता नसलं तरी ती इंग्लंडमध्येच झाली हे नक्की. याबाबत एक गोष्ट प्रसिध्द आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून लांबी-रुंदी मोजण्यासाठी हातांचा, पायांचा, बोटांचा वापर होत आलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून माणसाच्या कमरेचं माप म्हणजेच एक यार्ड असं मानलं जात असे पण प्रत्येकाच्या कमरेचं माप वेगळं असतं, मग कुणाच्या कमरेचं माप मोजायचे? इसवी सनाच्या बाराव्या शतकात एक यार्ड म्हणजे नेमकं किती हा प्रश्र्न पुढे आला त्यावेळी राजा पहिला हेन्री हा इंग्लंडवर राज्य करीत होता. त्याने असं जाहीर केलं की त्याच्या नाकाच्या शेंड्यापासून नाकासमोर सरळ धरलेल्या हाताच्या अंगठ्यापर्यंंतच्या अंतराएवढे माप म्हणजेच एक यार्ड होय. ही पध्दत साधारण सहाशे वर्षे वापरली गेली. पुढे 1866 पासून लंडनमधील ट्राफल्गार चौकातील कास्याच्या पट्टीच्या लांबी वरून एक यार्ड अंतर मोजले जाते. अमेरिकेत एक यार्ड म्हणजे 0.9144 मीटर तर आपल्याकडे एक यार्ड म्हणजे 91.44 सेंटीमीटर म्हणजे साधारणपणे तीन फूट मानले जाते.
विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.