मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Science Aptitude Test

रिचर्ड फाईनमन यांच्या पुस्तकातून साभार....

एका पुस्तकात चार चित्रांनी सुरुवात केलेली होती. पहिले एक चावी भरलेले खेळणे होते आणि मग एक मोटारीचे चित्र होते. तिसऱ्यात एक मुलगा सायकल चालवत होता आणि चौथ्यात असेच काहीतरी होते.प्रत्येक चित्राखाली एकाच प्रश्न होता... हे सारे कश्यामुळे होते? मला वाटले, मला माहित आहे की, ते आता यंत्रे आणि त्यांचे शास्त्र याबद्दल बोलणार आहे. त्या खेळण्यात भरलेल्या चाविमुळे कसे ते खेळणे फिरते... किंवा रसायनशास्त्र, मोटारीचे इंजिन कसे पेट्रोलमुले चालते आणि जीवशास्त्र... म्हणजे स्नायू कसे काम करतात. माझे वडील असते तर ते अश्याच पद्धतीने मला शिकवत असते! हे सारे कशामुळे चालते? हे सारे चालते कारण सूर्य सतत चमकत असतो... मग त्यावर आम्ही चर्चा करत राहिलो असतो... शिकण्या शिकवन्यातली गम्मत सानुभावली असती. "नाही, हे खेलाने हलते कारण आतली स्प्रिंग चावी भरून गुंडाळलेली आहे," मी म्हणालो असतो. "आता ती स्प्रिंग कशी गुंडाळली गेली...?" "मी चावी फिरवली म्हणून गुंडाळली." "आणि तू कशामुळे फिरवू शकलास?"  "कारण मी अन्न खाल्ले होते." आता अन्न तयार होते ते झाडांमुळे अन त्याचे

Newton's Law of Motion

What I saw today was very dramatic scene on the market street when I was going to meet sadashiv, my old and only friend in the town. An old aged lady, about 60 was beating a man who was in deep sleep beside the gutter. When I heard that he was no one other than her only son, I was shocked. The crowd was going to increase in number now and no one was dared to stop her from her passionate act.  Her son was now trying to get up but with each stroke of lathi on his back at he was groaning. Finally one man, nearly of same age, came making out of the way from the crowd and asked lady in a hard tone, "Shanti, what are you doing? Please stop this nonsence." "Am I making nonsence? What do you think?" Shanti was in fury and thought came to my mind, how could be her name 'Shanti'. "No I was just asking, why are you beating him, he is the only son of yours'?" The tone of  the man was soft one at this time. "I am not beating him, I am just applying so

मराठी विज्ञान परिषद, मुंबई शिष्यवृत्ती योजना

मूलभूत विज्ञानात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने एम. एससी. (भौतिकशास्त्र/गणित किंवा संख्याशास्त्र /रसायनशास्त्र/जीवशास्त्र {वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री}) किंवा एम.ए.(गणित/संख्याशास्त्र) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विज्ञान परिषद एक शिष्यवृत्ती योजना राबवत आहे. शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक विषयातील दोन विद्यार्थांची निवड करण्यात येईल. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.  https://www.mavipamumbai.org/

गॅलिलिओने केलेला प्रयोग

विज्ञानात प्रयोगाचे महत्व विशद करून सांगणाऱ्या गॅलिलिओने बरेच प्रयोग केले होते त्यातील एक मजेदार प्रयोग आपण जाणून घेऊया. १६३८ साली प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी गॅलिलिओ व त्याचा एक मित्र एका अंधाऱ्या रात्री साधारण एक मैल लांब अंतरावर असलेल्या टेकड्यांवर कंदील घेऊन उभे राहिले. त्यांची कल्पना अशी होती की गॅलिलिओने कंदिलाचे झापड उघडताच प्रकाश त्याच्यापासून त्याच्या मित्रापर्यंत पोहचेल व त्याला तो प्रकाश दिसला कि तो त्याच्याजवळच्या कंदिलाचे झापड उघडेल. या दोन्ही गोष्टींसाठी लागलेला वेळ गॅलिलिओ त्याच्या नाडीच्या ठोक्यांवरून मोजेल. मोजलेल्या वेळेत प्रकाशाने गॅलिलिओपासून मित्रांपर्यंत व त्यापासून परत गॅलिलिओपर्यंत असे एकूण दोन मैल अंतर कापलेले असेल आणि यावरून प्रकाशाचा वेग मोजता येईल पण हा प्रयोग पूर्णतः फसला कारण प्रकाशाचा असलेला प्रचंड वेग मोजण्यासाठी एक-दोन मैल अंतर हे नगण्य ठरते. यावरून गॅलिलिओला एक गोष्ट मात्र कळाली की प्रकाशाचा खूपच जास्त आहे आणि माणूस तो मोजू शकेल की नाही याबद्दल मात्र तो साशंक होता. पण या प्रयोगानंतर ४० वर्षांच्या आत डच खगोलनिरीक्षक ओलस रोमर याने गुरूच्या चंद्रग्रहणाव

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्दल बरेच किस्से

विज्ञान रंजन स्पर्धा 2019

विज्ञान रंजन स्पर्धा 2019 सूचना - प्रवेश मुल्य नाही . आकर्षक बक्षिसे . खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने , कोणालाही विचारून , इतरत्र शोधून , प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील.उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत मराठी विज्ञान परिषद , पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर , टिळक रस्ता , पुणे 411030 येथे पोचवावीत. प्राथमिक विजेत्यांची नावे 20 फेब्रुवारीला जाहीर केली जातील.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्राथमिक विजेत्यांची अंतिम फेरी 28 फेब्रु. ते 2 मार्च काळात - गांधी विज्ञान संमेलन , सेवाग्राम , वर्धायेथे होईल शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील . शिक्षण : पाचवीपर्यंत( 10), सातवीपर्यंत ( 9), दहावीपर्यंत ( 7), बारावीपर्यंत*( 5), पदवीपर्यंत*( 3),* शास्त्र-शाखा असल्यास ( 0) वय वर्षे: 13 पर्यंत ( 6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2) ,61 ते 80 (4), 81 च्यावर ( 6). * आपल्या उत्तरपत्रिकेसोबत पुढील माहिती लिहून पाठवावी -* 1. संपूर्ण नाव , 2. पत्ता (पिनकोडसह) , 3. संपर्क दूरध
विज्ञान रंजन स्पर्धा 2019 सूचना - प्रवेश मुल्य नाही . आकर्षक बक्षिसे . खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने , कोणालाही विचारून , इतरत्र शोधून , प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील.उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत मराठी विज्ञान परिषद , पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर , टिळक रस्ता , पुणे 411030 येथे पोचवावीत. प्राथमिक विजेत्यांची नावे 20 फेब्रुवारीला जाहीर केली जातील.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्राथमिक विजेत्यांची अंतिम फेरी 28 फेब्रु. ते 2 मार्च काळात - गांधी विज्ञान संमेलन , सेवाग्राम , वर्धायेथे होईल शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील . शिक्षण : पाचवीपर्यंत( 10), सातवीपर्यंत ( 9), दहावीपर्यंत ( 7), बारावीपर्यंत*( 5), पदवीपर्यंत*( 3),* शास्त्र-शाखा असल्यास ( 0) वय वर्षे: 13 पर्यंत ( 6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2) ,61 ते 80 (4), 81 च्यावर ( 6). * आपल्या उत्तरपत्रिकेसोबत पुढील माहिती लिहून पाठवावी -* 1. संपूर्ण नाव , 2. पत्ता (पिनकोडसह) , 3. संपर्क