विज्ञानात प्रयोगाचे महत्व विशद करून सांगणाऱ्या गॅलिलिओने बरेच प्रयोग केले
होते त्यातील एक मजेदार प्रयोग आपण जाणून घेऊया.
१६३८ साली प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी गॅलिलिओ व त्याचा एक मित्र एका अंधाऱ्या
रात्री साधारण एक मैल लांब अंतरावर असलेल्या टेकड्यांवर कंदील घेऊन उभे राहिले.
त्यांची कल्पना अशी होती की गॅलिलिओने कंदिलाचे झापड उघडताच प्रकाश त्याच्यापासून
त्याच्या मित्रापर्यंत पोहचेल व त्याला तो प्रकाश दिसला कि तो त्याच्याजवळच्या
कंदिलाचे झापड उघडेल. या दोन्ही गोष्टींसाठी लागलेला वेळ गॅलिलिओ त्याच्या
नाडीच्या ठोक्यांवरून मोजेल. मोजलेल्या वेळेत प्रकाशाने गॅलिलिओपासून
मित्रांपर्यंत व त्यापासून परत गॅलिलिओपर्यंत असे एकूण दोन मैल अंतर कापलेले असेल
आणि यावरून प्रकाशाचा वेग मोजता येईल पण हा प्रयोग पूर्णतः फसला कारण प्रकाशाचा
असलेला प्रचंड वेग मोजण्यासाठी एक-दोन मैल अंतर हे नगण्य ठरते. यावरून गॅलिलिओला
एक गोष्ट मात्र कळाली की प्रकाशाचा खूपच जास्त आहे आणि माणूस तो मोजू शकेल की नाही
याबद्दल मात्र तो साशंक होता. पण या प्रयोगानंतर ४० वर्षांच्या आत डच खगोलनिरीक्षक
ओलस रोमर याने गुरूच्या चंद्रग्रहणावरून प्रकाशाचा वेग मोजला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा