मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Science Aptitude Test

अर्थपूर्ण विज्ञानकथा- मुर्ख गाढवं- आयझॅक आसिमॉव्ह

आयझॅक आसिमॉव्ह यांचं विज्ञानाशी संबंधित लिखाण हे जगप्रसिद्ध आहे. विज्ञानातील संकल्पना अगदी सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगंं आहेच पण वैज्ञानिक कथांच्या माध्यमातून वाचकांना खिळवून ठेवण्याचं सुद्धा सामर्थ्य त्यांच्या लिखाणात आहे. त्यांच्या रोबोटिक्सशी संबंधित शंभराहून अधिक कथा प्रकाशित आहे पण रोबोटिक्स सोडूनही काही उत्कृष्ट कथा त्यांनी लिहिलेल्या आहे, त्यातील एका कथेबाबत कथेचा काळ हा लिखाणाच्या काळाशी मिळता जुळता आहे. फेब्रुवारी 1958 साली प्रकाशित या कथेत पृथ्वीवरील मानवाने अणुंच्या विभाजनाचे तंत्र आत्मसात केलं आहे पण अवकाशगमनाचं तंत्र मात्र त्याच्या हातात नाही.  एका दीर्घायू राजन्य जमातीतील नॅरोन या दीर्घिका निबंधकाचे अवकाशातील तारा मंडळातील जमातीच्या नोंदी ठेवणे तसेच त्यांचं बुध्दीमान व प्रगल्भ या गटांत वर्गीकरण करणे हे काम असतं. जेव्हा त्याला पृथ्वीवरील मानव जमातीच्या अणुंच्या विभाजनाचे तंत्रज्ञान कळते तेव्हा तो मानवजातीच्या पुढे बुध्दीमान लिहतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की यांना अवकाशगमनाचं तंत्र अवगत नाही आणि यांनी स्वतःच्या ग्रहावरच अणुचाचणी केली आहे तेव्हा

शोधांच्या गोष्टी- नेपच्यूनचा शोध

विल्यम हर्षल यांना 13 मार्च 1781 रोजी स्वतः बनवलेल्या दुर्बिणीच्या सहाय्याने अवकाश निरीक्षण करतांना युरेनस या ग्रहाचा शोध लागला. या शोधाबरोबरच खगोलशास्त्रात एक समस्या उभी राहिली. न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार युरेनसची भ्रमणकक्षा आणि त्याची प्रत्यक्ष भ्रमणकक्षा यांत तफावत आढळून येत होती. हे असं का होतं असावं? न्युटनचा नियम तर चुकला नसेल ना? युरेनस असं का वागत असेल? असे प्रश्न उपस्थित झाले. बरीच लोकं यावर काम करत होती. सर्व बाजूंनी विचार करून कुणालाही उत्तर मिळत नव्हते.  1841 साली केंब्रिज विद्यापीठात खगोलशास्त्र शिकणाऱ्या जॉन अॅडम्स या विद्यार्थ्याला मात्र न्युटनच्या नियमावर विश्वास होता. त्याला असं वाटलं की युरेनसच्या भ्रमणकक्षेवर परिणाम करणारं एखादं गुरूत्वबल ग्रहाच्या स्वरूपात असावं आणि न्युटनच्या नियमाप्रमाणेच ते युरेनसवर कार्य करत असावं. मग या भल्या मोठ्या अवकाशात तो ग्रह शोधायचा कसा? यावर त्यानं वेगळीच शक्कल लढवली. त्याच्या मते या ग्रहावर सुर्य, गुरू, शनी व युरेनस यांचं गरूत्वबल कार्यरत असेल मग त्यानं सुर्यापासून या ग्रहांची अंतरं बघितली असता एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्य