मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Science Aptitude Test

सत्येंद्रनाथ बोस उद्या सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल थोडसं बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म १ जानेवारी १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते. सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथेच झाले. लहानपणापासूनच वर्गात पहिला क्रमांक मिळ्वून उत्तीर्ण होण्याचा जणू त्यांना छंदच होता. पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. शाळेत असतांना एकदा त्यांना गणिताच्या परिक्षेत १०० पैकी ११० गुण देण्यात आले कारण सगळी गणिते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि अचूक सोडविली होती. त्यांचे मित्रच नव्हे तर इतरही विद्यार्थी म्हणत की सत्येंद्रनाथ शिकत असतांना पहिला क्रमांक सोडून देऊन इतर क्रमांकासाठीच प्रयत्न करता येतील. सत्येंद्रनाथ यांनी प्रेसीडेन्सी कॉलेज मधून १९१५ साली आपली पदवी प्राप्त करतांनाही पहिला क्रमांक सोडला नाहीच , यावेळी ते संपूर्ण विद्यापिठातून प्रथम आले होते. त्यांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. त्य
तेजोनिधी लोह गोल तेजोनिधी लोह गोल, भास्कर हे गगनराज हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज दिव्य तुझ्या तेजाने, झगमगले भूवन आज हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती अमृतकण होऊन, अणुरेणू उजळिती तेजातच जनन मरण , तेजातच नवीन साज    हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज ज्योतिर्मय मूर्ती तुझी, ग्रहमंडळ दिव्य सभा दाहक परि संजीवक, करुणारून किरणप्रभा होवो जीवन विकास, वसुंधरेची राख लाज हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज तेजोनिधी लोह गोल, भास्कर हे गगनराज हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज कवी- पुरुषोत्तम दारव्हेकर नाटक- कट्यार काळजात घुसली  
सर . जे. जे. थॉमसन पहिल्यांदा अणूला भेदणारा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले ब्रिटीश वैज्ञानिक सर जे. जे. थॉमसन ज्यांना त्यांनी लावलेल्या इलेक्ट्रॉनच्या व वायूंच्या विद्युतवाहकतेसंबंधीच्या संशोधनाबद्दल १९०६ सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यांचा आज जन्मदिवस एका पुस्तक दुकानाच्या मालकाचा मुलगा ज्याने ३५ वर्षे जेम्स मॅक्सवेल यांनी स्थापन केलेल्या कॅब्रिज विद्यापीठातील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीचा व्याप सांभाळला. त्याला स्वतःला मिळालेल्या नोबेल पुरस्कारासोबतच त्याच्या सहा विद्यार्थ्यांनासुद्धा नोबेल मिळाले, त्यात त्याचा स्वतःचा मुलगासुद्धा होता. कॅथोड किरणांवर संशोधन करून त्यांचे वस्तुमान समजले जाते त्यापेक्षा खूपच कमी असून कुठल्याही अणूतून बाहेर पडल्यावर ते सारखेच असते व कॅथोड किरण हे मुळात खूपच हलक्या ऋणप्रभारित कणांपासून बनलेले आहे. यावरूनच तोपर्यंत मान्य असलेला अणु अविभाज्य असलेला सिद्धांत त्यांनी मोडीत काढला व अणूच्या अंतर्गत भागात काही धनप्रभारित तर काही ऋणप्रभारित भार असतात आणि त्या दोघांचे मूल्य समान असल्यानेच अणु हा विदयुतदृष्ट्या उदासीन असतो हे सिद्ध केले. याच ऋण
ओळखा पाहू ? वेगवेगळ्या विज्ञानशाखांमध्ये दोन नोबेल मिळवणारी एकमेव व्यक्ती जी विज्ञानक्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व तिच्याच मुलीला ते मिळेपर्यंत एकमेव स्त्री होती. तिने आपल्या पतीसोबत संशोधन करतांना दोन नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला, त्यातील एकाला त्याच्या गुणधर्मांवरून तर दुसऱ्याला स्वतःच्या मायदेशावरून नाव दिले.  स्वतःच्या लग्नात भेट म्हणून मिळालेल्या सायकलींवरून हनिमूनला जाणाऱ्या प्रसिद्ध जोडप्यातील स्त्रीचे नाव काय? 

हेन्री बेक्वेरेल

१५ डिसेंबर १८५२ रोजी जन्मलेल्या हेन्री यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेवूया. १८९६ सालापर्यंत स्फूरदिप्ती बद्दल बरीच माहिती होती. काही पदार्थ सूर्यप्रकाश शोषून घेतात व सूर्यप्रकाशातून घेतलेल्या लहरी किंवा किरणे काही वेळाने पुन्हा उत्सर्जित करतात. अमावसेच्या रात्री स्मशानात जे चमकतांना दिसते ते मानवाच्या शरीरातील स्फुरद किंवा फोस्परस असते. प्राचीन काळापासून या गुणधर्माची निरीक्षणे होत होती. हेन्री यांच्या वडिलांनी सुध्दा यांवरकाम केले होते. स्वतः हेन्री यांचे सुरुवातीचे संशोधन हे स्फूरदिप्तीसंबधीच होते.  १८९५ साली विल्यम रंटजेन यांना एक्स रे चा शोध लागला आणि आणखी कुठल्या पदार्थांतून एक्स रे बाहेर पडतात हे शोधण्यासाठी स्पर्धा लागली. यावेळी हेन्री युरेनिअमच्या क्षारांवर प्रयोग करत होते आणि या क्षरांमधून सुध्दा एक्स रे बाहेर पडत असतील का? असा प्रश्न त्यांना पडला व याचा शोध घेण्यासाठी त्यांनी युरेनिअमचे क्षार काळ्या कागदात गुंडाळलेल्या फोटोग्राफीक प्लेटवर ठेवून ती  सूर्यप्रकाशात धरली व नंतर त्या प्लेटचे निरीक्षण केले तर त्यांना ती प्लेट ढगाळलेली दिसली म्हणजे य