सर . जे. जे. थॉमसन
पहिल्यांदा अणूला भेदणारा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले ब्रिटीश वैज्ञानिक सर
जे. जे. थॉमसन ज्यांना त्यांनी लावलेल्या इलेक्ट्रॉनच्या व वायूंच्या
विद्युतवाहकतेसंबंधीच्या संशोधनाबद्दल १९०६ सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार
मिळाला होता त्यांचा आज जन्मदिवस
एका पुस्तक दुकानाच्या मालकाचा मुलगा ज्याने ३५ वर्षे जेम्स
मॅक्सवेल यांनी स्थापन केलेल्या कॅब्रिज विद्यापीठातील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीचा
व्याप सांभाळला. त्याला स्वतःला मिळालेल्या नोबेल पुरस्कारासोबतच त्याच्या सहा
विद्यार्थ्यांनासुद्धा नोबेल मिळाले, त्यात त्याचा स्वतःचा मुलगासुद्धा होता.
कॅथोड किरणांवर संशोधन करून त्यांचे वस्तुमान समजले जाते
त्यापेक्षा खूपच कमी असून कुठल्याही अणूतून बाहेर पडल्यावर ते सारखेच असते व कॅथोड
किरण हे मुळात खूपच हलक्या ऋणप्रभारित कणांपासून बनलेले आहे. यावरूनच तोपर्यंत
मान्य असलेला अणु अविभाज्य असलेला सिद्धांत त्यांनी मोडीत काढला व अणूच्या अंतर्गत
भागात काही धनप्रभारित तर काही ऋणप्रभारित भार असतात आणि त्या दोघांचे मूल्य समान
असल्यानेच अणु हा विदयुतदृष्ट्या उदासीन असतो हे सिद्ध केले. याच ऋणप्रभारित
कणांचा म्हणजेच इलेक्ट्रॉनचा शोधसुध्दा लावला.
किरणोत्सारी मूलद्रव्यांप्रमाणे स्थिर मूलद्रव्यांचेसुध्दा समस्थानिके असतात
हे शोधण्याचे श्रेय सर जे. जे. थॉमसनयांच्याकडेच
जाते. जेम्स मॅक्सवेल यांच्या विदयुतचुंबकीय संशोधनातील अनेक गणिती
प्रारूपांना प्रकाशित करून उजेडात आणण्याचे कामसुद्धा सर जे. जे. थॉमसन यांनीच केले. १९०८ साली नाईटहूड तर १९१२ साली ऑर्डर
ऑफ मेरिट पुरस्कार मिळालेल्या या महान शास्त्रज्ञाला त्याच्या जन्मादिनाबद्दल
अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा