इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता. (या थेल्सबद्...

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा