मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

विज्ञान कोडी

कोडं क्र. 12 खोलीचा अंदाज

आपल्या डोळ्यांचा वापर करून स्विमिंग पूलच्या खोलीचे अंदाजे मूल्यमापन केल्यास आपल्याला अनेकदा खोली कमी असल्याचे भासते. का?

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 11- कोणते ग्रहण? 

खाली आकृतीत एक ग्रहण योजनाबद्धपणे दर्शविले गेले आहे. हे सूर्यग्रहण आहे की चंद्रग्रहण आहे?

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 10- बर्फ आणि पाणी 

बर्फाचा एक तुकडा एका काचेच्या पेल्यातील पाण्यावर तरंगतो. बर्फ वितळल्यावर त्या पेल्यातील पाण्याची पातळी बदलू शकेल का? आणि का?

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.

कोडं क्र. 9- अंधारात

काल मी लाईट बंद केला आणि अंधार होण्यापूर्वी अंथरुणावर पडलो. लाईट स्विच आणि अंथरुणादरम्यान अंतर 3 मीटर आहे. मी हे कसे करू शकतो? (प्रकाशाचा वेग 300,000 किमी / सेकंद आहे.)

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 8- सफरचंदांची टोपली.

वेगवेगळ्या आकाराची (लहान-मोठे) सफरचंदे असलेली टोपली जोर-जोरात हलवल्यानंतर कुठल्या आकाराची सफरचंदे टोपलीच्या वरच्या भागात असतील आणि का?

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 7- परत येणारा चेंडू

तुम्ही शक्य तितक्या जोरात चेंडू कसा फेकू शकता की तो तुमच्याकडे परत आला पाहिजे जरी तो कशालाच धडकला नाही, त्याला काहीही जोडलेले नाही आणि इतर कोणीही त्याला पकडत नाही किंवा फेकत नाही

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 6- कॉफी आणि क्रीम

तुम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये गरम कप कॉफी आणि रूम-टेंपरेचर असलेलं क्रीम दिलं जातं. कॉफी पिण्यापूर्वी तुम्हाला काही मिनिटे वाट पाहायची आहे आणि ती पिताना ते शक्य तितके गरम असावे अशी तुमची इच्छा आहे. कॉफीमध्ये क्रीम केव्हा ओतावे म्हणजे तुम्हाला शक्य तितकी गरम कॉफी प्यायला मिळेल?

अ) ताबडतोब

ब) पिण्यापूर्वी

क) काही फरक पडत नाही

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 5- जड आणि हलकी वस्तू

जर तुम्ही 50 मीटर उंचीवरून 15 किलो लोखंडी पट्टी आणि 5 किलो कापसाची पिशवी टाकलीत तर कोणती वस्तू आधी जमिनीवर पोहोचेल? आणि का?

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 4- ओळख चुंबकाची

तुम्ही एका खोलीत बंदिस्त आहात आणि तुमच्याकडे दोन धातूच्या सळ्या दिल्या जातात. या दोन सळ्यांपैकी एक चुंबक आहे आणि दुसरी लोखंडी आहे. त्या अगदी सारख्याच दिसतात. तुमच्याकडे खोलीत दुसरी कोणतीही धातूची वस्तू नाहीये.

त्यापैकी कोणता चुंबक आहे हे तुम्ही कसे ठरवाल

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 3- तापमानाची एककं

दोन बादल्या आहे, त्यापैकी पहिल्या बादलीतील पाण्याचे तापमान 250 सेल्सिअस आहे तर दुसऱ्या बादलीतील पाण्याचे तापमान 250 फॅरनहाईट आहे.

एक नाणं दोन्ही बादल्यांमध्ये सारख्याच उंचीवरून सोडले असता कोणत्या बादलीत नाणं तळाशी लवकर पोहचेल?

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


कोडं क्र. 2- दूध आणि पाणी

एक मग दूध आणि एक मग पाणी एका भांड्यात अशा पध्दतीने ओतायचे आहे की

आपण त्यांना वेगळं ओळखू शकलो पाहिजे,

आपण त्यांना वेगळं करू शकलो पाहिजे,

त्यांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा पडदा आपण वापरू शकत नाही.

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.

कोडं क्र. 1- मेणबत्तीची समस्या

कल्पना करा की आपल्याकडे खालील चित्रातील साहित्य आहे आणि त्याचा वापर करून भिंतीला (नोटीस बोर्डवर) मेणबत्ती अशाप्रकारे लावायची आहे की पेटवल्यानंतर मेणबत्तीचे मेण खाली भिंतीला टेकून ठेवलेल्या टेबलावर पडणार नाही.

साहित्य- मेणबत्ती, आगपेटी, टाचणी पेटी.

चला तर मग शोधा आणि तुमचं उत्तर खालील टिप्पणी मध्ये लिहून पाठवा.


टिप्पण्या

  1. पाणी आणि दूध यांच्या मिश्रणातून दूध आणि पाणी वेगळ करायचं असल्यास दोघांच्याही मिश्रणाला गरम करावे म्हणजेच पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी अलग होणार व दुध भांड्यात राहील

    उत्तर द्याहटवा
  2. 1 : 25 celcius च्या बादलीत लवकर जाईन.. 25 ferenhit म्हणजे - काहीतरी celcius .. म्हणजे च त्या बादलीत बर्फ असेल..

    2 : एका च भांड्यात दोन वेगळे वेगळे ओता.. हे नाही म्हणाले की एका च सोबत ओतायचे आहे !

    3 : मेणबत्ती च्या खाली टाचणी पेटी ठेवली तर मेण त्याचात पडेल.. टेबल वर नाही ! :-)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 1: अगदी बरोबर
      3: थोडेसे उत्तराच्या जवळ आहात, अजून विचार करा. टिप- संपूर्ण साहित्याचा वापर करावा

      हटवा
  3. नाणे b महा म्हणजेच 25 फॅरेनहाइट पाण्यामध्ये लवकर पडेल

    उत्तर द्याहटवा
  4. दोन्ही सळयांना अलग ठेवून दोघांनाही घुमवा जी सळई लोखंडी असेल तिला कितीही वेळा घुमावल तर ती प्रत्येक वेळेस अलग अलग दिशांना थांबेल पण चुंबकीय सळई नेहमी उत्तर दक्षिण हीच दिशा दाखवेल म्हणजे तिला कितीही वेळा घुमावल तर ती एकाच दिशेला थांबेल

    उत्तर द्याहटवा
  5. प्रथम त्या भांड्यातील पाणी refrigerator मध्ये ठेवून त्याचा बर्फ करावा.नंतर तो बर्फ त्या भांड्यात ठेवून त्यावर दूध ओता.आता आपण त्यांना वेग-वेगळे ओळखू शकतो आणि दूध काढून तो बर्फ तसाच ठेवला तर त्याचे पुन्हा पाणी होणार अशा प्रकारे आपण त्यांना वेग-वेगळे पण करू शकतो.

    उत्तर द्याहटवा
  6. दोन्ही वस्तू जमिनीवर एकसोबत पडतील
    याचे कारण असे आहे की गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचे प्रवेग (जी) शरीराच्या वस्तुमानाकडे दुर्लक्ष करून स्थिर मूल्य राखते. ... म्हणून, समान उंचीवरून खाली सोडल्यास एकाच वेळी भिन्न वस्तु असलेल्या दोन वस्तू जमिनीवर आदळतात. हा प्रयोग खुपवर्षामपूर्वी गॅललिओ या महान शास्त्रज्ञाने केला होता

    उत्तर द्याहटवा
  7. एका सळई चं टोक दुसऱ्या सळई च्या मध्यभागी लावा, नंतर तेच टोक दुसऱ्या सळई च्या टोकाला लावा जर आकर्षक शक्ती मध्ये बदल जाणवला तर ती सळई चुंबक आहे नाही जाणवला तर दुसरी सळई चुंबक आहे

    उत्तर द्याहटवा
  8. Coffee and cream:
    Rate of heat transfer principle वापरलं तर Cream लगेच टाकून Rate कमी करून त्याचा फायदा जास्त जास्त घ्यावा.

    पण, आपण असे करत नाही कारण आपल्याला पहिला घोट हा गरम जास्त पाहिजे असतो. त्यामुळे cream नुकतेच coffee पियायच्या आधी आपण टाकतो आणि मिश्रणाचे Temperature equilibrium यायच्या आधीच coffee चा घोट घेतो. ह्याने एकंदरीत post equilibrium coffee temperature कमी मिळणार, पण first swig हा अधिक गरम मिळणार ! 🙏

    उत्तर द्याहटवा
  9. चेंडू ला वर फेकल्याने तो गुरुत्वाकर्षणाच्या शक्ती मुळे तो परत आपल्याकडेच येणार

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण तो चेंडू वर फेकला, तर तो गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या कडे कशाला ही न धडकता येईल.

      हटवा
  10. प्रश्न क्र. 7 तो चेंडू स्वतःच्या वरच्या दिशेने फेकावा म्हणजे तो पुन्हा आपल्याकडे येईल

    उत्तर द्याहटवा
  11. 11. Chandra Grahan
    Surya ani chandrachy madhe prithvi yeun prithvi chi savli chandrala zakun gheil manun chandra grahan hoil.

    उत्तर द्याहटवा
  12. 12. Depth kami vatte due to reflection of light which travelles from bottom to eyes.
    Light change it's direction when passes through different medium here while it's travelling through liquid medium that is water to air medium it's change it's path it bends after exit from liquid into air so we found shallow depth.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्याच पिवळ्या रंगाचा प्रका

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्दल बरेच किस्से

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)