मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Science Aptitude Test

गोलाकार इंद्रधनुष्य

सूर्याभोवती गोलाकार इंद्रधनुष्य दिसणे म्हणजे पर्वणीच. कालच्या सुर्यग्रहणानंर आज सकाळी आडगांव ता. भोकरदन जि. जालना येथून हे दृश्य दिसले.  अशाप्रकारचे दृश्य ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांमधून होणार्या प्रकाशाच्या अपस्करणानंतर दिसून येते. इंग्रजीत याला हॅलो असे म्हणतात. सिरस किंवा सिरोस्ट्रॅटस या प्रकारच्या ढगांमध्ये मुख्यतः बर्फाची स्फटिकं असतात, या षटकोनी आकाराच्या स्फटिकांमधून प्रकाश जात असताना, तो 22 ° कोनात वाकलेला असतो या स्फटिकांमधून बाहेर पडताना या प्रकाशाचे अपस्करण होऊन सूर्याभोवती गोलाकार प्रभामंडप तयार करतो. या विशिष्ट प्रकारच्या इंद्रधनुष्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे यामधील रंगाचा क्रम हा साधारण इंद्रधनुष्यातील रंगांच्या अगदी उलट असतो. या इंद्रधनुष्याच्या आतील बाजूस लाल रंग तर बाहेरील बाजूस जांभळा रंग असतो. या रंगक्रमाच्या उलट होण्यामागे बर्फाच्या स्फटिकांतर्गत दोनदा होणारे प्रकाशाचे परावर्तन हे आहे.  अगदी सुरुवातीच्या काळात हवामानाच्या अंदाजासाठी यांचा उपयोग होत असे. असं सांगितलं जातं की या प्रकारचा प्रभामंडप म्हणजे पावसाची नांदी होय. या दृश्यानंतर चोवीस तासात पाऊस

अयनदिनी सुर्यग्रहण

दरवर्षी 21 जून रोजी सुर्याचे दक्षिणायन सुरू होते. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे होणारे सुर्याचे भासमान भ्रमण यांस कारणीभूत असते. कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे सुर्य सरकतोय असा भास व्हायला सुरूवात होते. पृथ्वीवरील ऋतुचक्रासही ही घटना कारणीभूत ठरते. खरे तर वर्षातनं दोनदा अयन दिन असतात. एक म्हणजे 21 जून ज्या दिवशी कर्कवृत्तावरून सुर्याचे दक्षिणायन सुरू होते तर दुसरे म्हणजे 22 डिसेंबर ज्या दिवशी मकरवृत्तावरून सुर्याचे उत्तरायण सुरू होते. पण याच दिवशी म्हणजे अयन दिनाच्या दिवशी सुर्यग्रहण होणे ही तशी काही नेहमीची घटना नाही.  वर्षातनं दोनदा अयन दिन त्याचबरोबर महिन्यातनं दोनदा एकतर अमावस्या किंवा पौर्णिमा हे लक्षात घेऊन बघितले असता अयन दिनाच्या वेळी पौर्णिमा किंवा अमावस्या सात ते आठ वर्षातनं एकदा असण्याची शक्यता असते. पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण किंवा प्रत्येक अमावस्येला सुर्यग्रहण होतेच असे नाही याचं कारण म्हणजे प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सुर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत असले तरी एकाच प्रतलात नसतात. या आधी 2001 साली व त्या आधी 1982 साली 21 जून या अयनदिनी सुर

गुलाबी लोणार सरोवर

गेल्या एक-दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे चर्चेचा विषय ठरले आहे याचं कारण म्हणजे लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदललेला दिसतोय. एरवी निळेशार दिसणारे पाणी चक्क गुलाबी दिसायला लागले आहे. याबाबत तुर्तास कोणताही निष्कर्ष काढणे कठीण असले तरी काही तर्क मात्र तज्ञांकडून लावले जात आहे. लोणार सरोवरातील पाण्यात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या बुरशीची वाढ जास्त प्रमाणात झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते निसर्ग चक्रीवादळामुळे झालेला वातावरणातील बदल आणि सरोवरातील पाण्याची खालावलेली पातळी ही यासाठी कारणीभूत ठरली असावी. लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे 52000 वर्षांपूर्वी 20 लाख टन वजनाच्या व 90000 किलोमीटर प्रती तास या वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळलेल्या उल्कापातामुळे झाली आहे. लोणार सरोवराचा आकार हा अंडाकृती असून साधारणपणे 1200 मीटरचा व्यास व 137 मीटर खोलीचे तळे या उल्कापातामुळे तयार झाले आहे. लोणार सरोवरातील पाणी हे खारं असून ते अल्कलीधर्मी आहे. लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचं आणि उल्कापातामुळे तयार झालेलं (हे दोन्ही गुणधर्

दुहेरी इंद्रधनुष्य

काल दुपारनंतर झालेल्या पावसाने दिल्लीकरांना दुहेरी आनंद दिला. एक म्हणजे गरमीच्या तडाख्यातून थोडासा थंडावा मिळाला आणि दुसरे म्हणजे दुहेरी इंद्रधनुष्याचे दर्शन झाले. तसे पाहता दुहेरी इंद्रधनुष्य ही काही आश्चर्याची गोष्ट नसली तरी ती नेहमीच दिसते असेही नाही त्यामुळे त्याबद्दल नवल ते कायम असते. प्रकाशाचे काही गुणधर्म असतात जसे की परावर्तन, अपवर्तन, अपस्करण इ. या सर्व गुणधर्मांचा एकत्रित परिपाक म्हणजे इंद्रधनुष्य होय. प्रकाशकिरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतांना माध्यमबदलामुळे स्वतःचा मार्ग बदलतात आणि थेंबाच्या मागील पृष्ठभागावरून परावर्तित होतात. एकदा परावर्तित झालेले किरण थेंबातून बाहेर पडताना पुन्हा एकदा माध्यमबदलामुळे स्वतःचा मार्ग बदलतात. या प्रत्येक प्रक्रियेमध्ये सुर्यकिरणांतील विविध तरंगलांबीच्या प्रकाशाचे अपवर्तन आणि परावर्तन वेगवेगळ्या कोनांतून होत असल्याने सात तरंगलांबीचे रंग वेगवेगळे होतात आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. आता गंमत अशी आहे की काही वेळा पाण्याच्या थेंबामध्ये प्रकाशाचे परावर्तन एकदा न होता दोनदा होते. सुर्य क्षितिजापासून जवळ म्हणजे खूप खाली असेल तेव्हा असं