ओळखा पाहू क्र. 8
मी कोण ते ओळखा, मी तुम्हाला वस्तू पाहण्यासाठी मदत करतो, जर मी नसतो तर तुम्हाला काहीच दिसले नसते. नुसता काळोख! काही जण म्हणतात की मी तरंगाच्या स्वरूपात प्रवास करतो तर काही जण म्हणतात कणांच्या स्वरूपात. आणि बरं का! मला प्रवासासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते. माझ्याच एका गुणधर्मामुळे तुम्ही इंद्रधनुष्य बघू शकतात.
चला तर मग कोण आहेत ते ओळखा आणि आपलं उत्तर खाली टिप्पणी मध्ये लिहा.
ओळखा पाहू क्र. 7
पारंपारिक गणिताच्या मर्यादा ओलांडून एका नव्या गणितीय शाखेचा शोध लावणाऱ्या या शास्त्रज्ञाने प्रकाशातील सात रंगांना उलगडून दाखवले, त्याचबरोबरीने चंद्र, सुर्य, ग्रह व पृथ्वीवरील वस्तू यांच्या गती काही ठराविक नियमांच्या अधीन असतात हे सिद्ध केले. प्रसिद्ध इंग्रज कवी वर्डस्वर्थ ने यांच्याबद्दल म्हटलं आहे की "विश्वात सगळीकडे अंधार होता, देव म्हणाला, "जा", हा आला आणि सगळीकडे प्रकाश उजळला"
चला तर मग कोण आहेत ते ओळखा आणि आपलं उत्तर खाली टिप्पणी मध्ये लिहा.
ओळखा पाहू क्र. 6
एका पुस्तक दुकानाच्या मालकाचा मुलगा ज्याने ३५ वर्षे जेम्स मॅक्सवेल यांनी स्थापन केलेल्या कॅब्रिज विद्यापीठातील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीचा व्याप सांभाळला. त्याला स्वतःला मिळालेल्या नोबेल पुरस्कारासोबतच त्याच्या सहा विद्यार्थ्यांनासुद्धा नोबेल मिळाले, त्यात त्याचा स्वतःचा मुलगासुद्धा होता.
चला तर मग कोण आहेत ते ओळखा आणि आपलं उत्तर खाली टिप्पणी मध्ये लिहा.
ओळखा पाहू क्र. 5
चर्चमध्ये बसलेला असतांना झोके घेणारा कंदील व हाताची नाडी यांचा संबंध जोडून दोलकाचा/ पेंड्युलमचा नियम शोधणारा १७ वर्षाचा मुलगा ज्याने पुढे स्वतः बनवलेली दूर्बिण आकाशाकडे वळवली आणि खगोलशास्त्राची तोपर्यंतची भाकिते मोडून पडली. पिसा येथील कलत्या मनोरयावरुन केलेल्या प्रयोगासाठी प्रसिध्द असलेला हा शास्त्रज्ञ कोण?
चला तर मग कोण आहेत ते ओळखा आणि आपलं उत्तर खाली टिप्पणी मध्ये लिहा.
ओळखा पाहू क्र. 4
प्रकाश विखुरण्याच्या मुलभूत संशोधनकार्यासाठी या भारतीय शास्त्रज्ञाला 1930 साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. आकाशाच्या निळ्या रंगाचे रहस्य त्यांनी उलगडून सांगितले. 7 नोव्हेंबर 1888 रोजी तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले ते पहिले आशियाई आणि गैर-गोरे होते ज्यांना विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांनी वाद्यांच्या ध्वनिमुशीवरही काम केले. तबला आणि मृदंगम यांसारख्या भारतीय ढोलांच्या आवाजाच्या सुसंगत स्वरूपाचे ते सर्वप्रथम संशोधन करत होते. भारतामध्ये संशोधन करून नोबेल पारितोषिक मिळवणारे ते एकमेव शास्त्रज्ञ आहेत.
चला तर मग कोण आहेत ते ओळखा आणि आपलं उत्तर खाली टिप्पणी मध्ये लिहा.
ओळखा पाहू क्र. 3
एक भारतीय शास्त्रज्ञ ज्यांनी 1895 साली विद्युतचुंबकीय प्रारणांचा उपयोग करून, कुठल्याही जोडणी शिवाय, 75 फूट अंतरावरील दुसऱ्या खोलीतील घंटा वाजवून दाखवली. त्यांनी रेडिओ लहरी ओळखण्यासाठीचं यंत्र बनवलं ज्याचा वापर करून मार्कोनीने जगातील पहिला रेडिओ बनवला. त्यांनी वनस्पतींच्या संवेदनांचे विश्लेषण करण्यासाठी क्रेस्कोग्राफ नावाचं यंत्र बनवलं ज्यामुळे वनस्पती सजीव असून त्या विविध संवेदनांना प्रतिसाद देत असतात हे लक्षात आलं. याचबरोबर ते बंगाली विज्ञान साहित्याचे जनकही समजले जातात.
चला तर मग कोण आहेत ते ओळखा आणि आपलं उत्तर खाली टिप्पणी मध्ये लिहा.
ओळखा पाहू क्र. 2
वेगवेगळ्या विज्ञानशाखांमध्ये दोन नोबेल मिळवणारी एकमेव व्यक्ती जी विज्ञानक्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व तिच्याच मुलीला ते मिळेपर्यंत एकमेव स्त्री होती. तिने आपल्या पतीसोबत संशोधन करतांना दोन नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला, त्यातील एकाला त्याच्या गुणधर्मांवरून तर दुसऱ्याला स्वतःच्या मायदेशावरून नाव दिले.
स्वतःच्या लग्नात भेट म्हणून मिळालेल्या सायकलींवरून हनिमूनला जाणाऱ्या प्रसिद्ध जोडप्यातील स्त्रीचे नाव काय?
चला तर मग कोण आहेत ते ओळखा आणि आपलं उत्तर खाली टिप्पणी मध्ये लिहा.
ओळखा पाहू क्र. 1
झेक प्रजासत्ताक मधील ब्रुनो शहरातील चर्चच्या पाच एकर जागेवरील बागेमध्ये 1856 ते 1863 ही सात वर्षे एका धर्मगुरू आणि वैज्ञानिक असलेल्या या व्यक्तीने अथक मेहनतीने 28000 वाटाण्यांच्या झाडांवर प्रयोग करून त्यांतील काही लक्षणांच्या आनुवंशिकतेचा अभ्यास केला. त्याने असे दाखवून दिले की, या लक्षणांच्या अनुवंशात काही सिद्धांतांचे पालन केले जाते. हे सिद्धांत पुढे त्याच्याच नावाने प्रचलित झाले. त्याने केलेल्या कामाचे महत्त्व इतरांना पटण्यासाठी 20 वे शतक उजाडावे लागले. या सिद्धांतांच्या पुनर्पडताळणीनंतर आज हेच सिद्धांत आधुनिक आनुवंशशास्त्राचा पाया ठरले आहेत.
चला तर मग कोण आहेत ते ओळखा आणि आपलं उत्तर खाली टिप्पणी मध्ये लिहा.
Sir C.V. Raman
उत्तर द्याहटवाJagdish chandra Bose
Mericury (hope)
1. galileo galilei
उत्तर द्याहटवा4.Chandrashekhar vyankat Raman
उत्तर द्याहटवा1. Gregor Johann Mendel
उत्तर द्याहटवा2. Marie Curie
3. Sir Jagadish Chandra Bose
4. Sir Chandrashekhar Venkata Ramana
5. Sir Galileo galilie
7. Sir Isac Newton
1. Gregor Johann Mendel.
उत्तर द्याहटवा2. Marie Curie.
3. Sir Jagadish Chandra Bose.
4. Sir Chandrashekhar Venkata Ramana.
5. Sir Galileo Galilei.
6.
7. Sir Isaac Newton.
5.
1 .Gregor Johan Mendel
उत्तर द्याहटवा2.Marie curie
3.Sir Jagadish Chandra Bose
4.Sir Chandrashekhar Venkat Ramana
5.Sir Galileo Galilei
7.Sir Isaac Newton
8.Sun
Light
उत्तर द्याहटवाIsaac nutan (hope)
प्रकाश
उत्तर द्याहटवा