मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती.
त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले.
थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.
 
(या थेल्सबद्दल बरेच किस्से प्रसिद्ध आहे त्यातील काही आपल्याला जयंत नारळीकरांच्या 'गणित आणि विज्ञान- युगायुगांची जुगलबंदी' तसेच अच्युत गोडबोलेंच्या 'किमयागार' मध्ये वाचायला मिळतात. थेल्स हा ग्रीक परंपरेतील पहिला तत्वज्ञ मानला जातो.)
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)