मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Science Aptitude Test

प्रकाशवर्ष म्हणजे काय?

प्रकाशवर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे पण अंतर तर आपण किलोमीटर, मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये मोजतो, मग प्रकाशवर्षामध्ये कोणतं अंतर मोजलं जातं? दोन ग्रह, ग्रह आणि तारे किंवा कोणत्याही दोन अवकाशीय खगोल यांच्यातील अंतर हे खूप जास्त असते. ते मोजण्यासाठी किलोमीटर, मीटर किंवा सेंटीमीटर ही एककं लहान पडतात आणि म्हणून हे अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष या एककाचा वापर केला जातो. मग एक प्रकाशवर्ष म्हणजे किती अंतर? प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर पार करतो तेवढे अंतर म्हणजे एक प्रकाशवर्ष. प्रकाश एका सेकंदात तीन लाख किलोमीटर एवढं अंतर पार करतो यावरून साधारणपणे 9500 अब्ज किलोमीटर एवढं अंतर तो एका वर्षात पार करतो. (सुर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर साधारण 15 कोटी किलोमीटर असलं तरी प्रकाशाला हे अंतर पार करण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद एवढाच वेळ लागतो)