मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

प्रकाशवर्ष म्हणजे काय?

प्रकाशवर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे पण अंतर तर आपण किलोमीटर, मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये मोजतो, मग प्रकाशवर्षामध्ये कोणतं अंतर मोजलं जातं?

दोन ग्रह, ग्रह आणि तारे किंवा कोणत्याही दोन अवकाशीय खगोल यांच्यातील अंतर हे खूप जास्त असते. ते मोजण्यासाठी किलोमीटर, मीटर किंवा सेंटीमीटर ही एककं लहान पडतात आणि म्हणून हे अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष या एककाचा वापर केला जातो. मग एक प्रकाशवर्ष म्हणजे किती अंतर?

प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर पार करतो तेवढे अंतर म्हणजे एक प्रकाशवर्ष. प्रकाश एका सेकंदात तीन लाख किलोमीटर एवढं अंतर पार करतो यावरून साधारणपणे 9500 अब्ज किलोमीटर एवढं अंतर तो एका वर्षात पार करतो.

(सुर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर साधारण 15 कोटी किलोमीटर असलं तरी प्रकाशाला हे अंतर पार करण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद एवढाच वेळ लागतो)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्...

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)