मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Science Aptitude Test

कार्ल सॅगन (जन्मदिवस - ९ नोव्हेंबर १९३४)

कार्ल एडवर्ड सॅगन हे एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ, ग्रहशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ, खगोलभौतिकशास्त्रज्ञ, खगोलजीवशास्त्रज्ञ, लेखक, कवी आणि विज्ञान संवादक होते. त्यांचे सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक योगदान म्हणजे बाह्य जीवनावरील संशोधन, ज्यात किरणोत्सर्गाद्वारे मूलभूत रसायनांपासून अमायनो आम्लांच्या निर्मितीचे प्रायोगिक प्रात्यक्षिक समाविष्ट आहे. सॅगनने अंतराळात पाठवलेले पहिले भौतिक संदेश संपादित केले (पायोनियर फलक आणि व्हॉयेजर गोल्डन रेकॉर्ड), असे वैश्विक संदेश जे कोणत्याही बाह्य बुद्धिमत्तेला सापडू शकतील व समजू शकतील. पृथ्वीव्यतिरिक्त विश्वातील जीवनाचा शोध घेण्यासाठी त्यांनी सेटी (सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल इंटेलिजन्स) नावाची संस्थाही स्थापन केली. त्यांनी अनेक विज्ञान पुस्तकेही लिहिली आहेत. १९८० च्या दशकातील कॉसमॉस : अ पर्सनल व्हॉयेज (विश्व: एक वैयक्तिक प्रवास) या मल्टी शो टेलिव्हिजन कार्यक्रमाचे ते प्रेझेंटर होते. या कार्यक्रमावर आधारित कॉसमॉस नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले. आपल्या हयातीत सेगनने ६०० हून अधिक वैज्ञानिक कागदपत्रे आणि लोकप्रिय लेख लिहिले आणि २० हून अधिक पुस्तके लिहिली. आपल्य

जोनास साल्क (जन्मदिवस- 28 ऑक्टोबर)

पोलिओच्या महामारीतून जगाला वाचवणाऱ्या महामानवाचा म्हणजेच जोनास एडवर्ड साल्क यांचा आज जन्मदिवस. 1914 साली अमेरिकेत निर्वासित ज्यु दांपत्य डॅनियल आणि डोरा यांच्या पोटी जन्मलेल्या साल्क यांनी 1955 साली पोलिओ वरील लसीचा शोध लावला. साल्क यांनी शोधलेली लस (आयपीव्ही) मारलेल्या किंवा निष्क्रीय, पोलिओ विषाणूच्या 1, 2 आणि 3 प्रकारावर आधारित आहे. 1950 च्या दशकात पोलिओच्या साथीचा प्रादुर्भाव मोडून काढण्यासाठी आयपीव्ही ही पहिली लस होती. हे इंजेक्शनद्वारे दिले जाते आणि रक्तप्रवाहातून प्रसारित केले जाते, जिथे ते सक्रिय प्रतिजैविकांची निर्मिती करते. पोलिओ हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा विषाणू मज्जासंस्थेवर आक्रमण करतो आणि काही तासांतच पूर्णपणे अर्धांगवायू होऊ शकतो. हा विषाणू प्रामुख्याने मल-मौखिक मार्गाद्वारे किंवा काही वेळा दूषित पाणी किंवा अन्नातून आतड्यांमध्ये स्थिरावतो.  पोलिओ उपसर्गाच्या 90 टक्के पेशंटमध्ये काहीच लक्षणे दिसून येत नाही. परंतू विषाणूंनी रक्तामध्ये प्रवेश केल्यास ताप, थकवा, डोकेदुखी, उलट्या, मानेचा ताठरपणा आणि अंगदुखी ही सुरुवातीची लक्षणे दिसतात. मध्यवर्ती मज्जासंस्थेमध

अरविंद कुमार- भौतिकशास्त्रज्ञ

जन्मदिन - १५ ऑक्टोबर १९४३ भारतातील विज्ञान-शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या प्रा. अरविंद कुमार यांचा जन्म दिल्लीला झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीला झाले. १९६९ साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात पीएच.डी. संपादन केली.         लंडन विद्यापीठात आणि जिनिव्हातील सर्न येथून पोस्ट-डॉक्टरल काम केल्यानंतर, प्रा. अरविंद कुमार भारतात परतले. त्यानंतर १२ वर्षे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकविज्ञान विभागात अध्यापनाचे काम केले. १९८४ साली प्रा. अरविंद कुमार यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.च्या) होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथे आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर अल्पावधीतच म्हणजे १९९४ साली त्यांच्यावर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ३१ ऑक्टोबर २००८ या दिवशी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातून ते ज्येष्ठ प्राध्यापक आणि संचालक म्हणून निवृत्त झाले.         आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात अरविंद कुमार यांनी सैद्धान्तिक भौतिकशास्र या विषयामध्ये संशोधन केले व याच विषयाचे अध्यापनही केले. शि

थॉमस अल्वा एडिसन

थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्यांचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच. फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. ह

नोबेल पारितोषिक 2020- रसायनशास्त्र

रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने दिनांक ७ ऑक्टोबर २०२० रोजी फ्रान्सच्या इमॅन्युएल शार्पेंची आणि अमेरिकेची जेनफिर डाउडना यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर केले. विज्ञानाचे नोबेल पारितोषिक महिला संघात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यांनी लावलेल्या शोधाचा वापर करून संशोधक अत्यंत अचूकतेने प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा डीएनए बदलू शकतात," असे नोबेल ज्युरींनी सांगितले. संशोधन मानवी शरीरातील काही व्याधी या अनुवांशिक असतात यासाठी आपल्या आई-वडिलांकडून प्राप्त जनुकं कारणीभूत असतात. ही जनुकं आपल्या शरीरातील पेशींमध्ये विविध प्रथिनांच्या निर्मितीत सहभागी असतात. निर्माण झालेली प्रथिनं शरीरात वेगवेगळी कार्ये करतात. काही वेळा आपल्या पेशींमधील जनुकांमध्ये विकृती होऊन व्याधीस कारणीभूत प्रथिनांची निर्मिती होते तर काही वेळा आवश्यक प्रथिनांच्या निर्मितीस कारणीभूत जनुकंच आपल्या पेशीत नसतात.  अशावेळी आवश्यक जनुकं डीएनएच्या साखळीमध्ये योग्य ठिकाणी बसवणे किंवा अनावश्यक जनुकं काढून टाकणे आवश्यक ठरते. यालाच जनुकीय तंत्रज्ञान असं म्हणतात. यासाठी योग्य त्या ठिकाणी डीएनए साखळी तोडणारे रेणू (जनुकीय

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्याच पिवळ्या रंगाचा प्रका

नोबेल पारितोषिक 2020- भौतिकशास्त्र

नोबेल समितीने भौतिकशास्त्राचे २०२० चे नोबेल पारितोषिक रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अँड्रिया गेज यांना देण्याचे जाहीर केले. नोबेल पुरस्कार जगभरात प्रतिष्ठेचा समजला जातो. हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. रॉजर पेनरोज यांनी व्यापक सापेक्षतेच्या सिद्धांताच्या साहाय्याने कृष्णविवराच्या निर्मितीचे भविष्य वर्तवता येऊ शकते असे संशोधनातून दाखवून दिले. तर, गेंजेल आणि गेज यांना आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या एका प्रचंड कृष्णविवराच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे . कृष्णविवर एखाद्या ताऱ्यातील इंधन संपले असता स्वतःच्या गुरूत्वाकर्षणाने तो तारा आकुंचन पावू लागतो, त्याचं आकारमान कमी होत जातं आणि त्याचं रूपांतर अनंत घनता असलेल्या एका विव

मेघनाद साहा

भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वाचे काम करणारे भारतीय शास्त्रज्ञ वाढदिवस - ६ ऑक्टोबर १८९३ मेघनाद साहा हे गणित आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रात काम करणारे एक भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे 'इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स'ची स्थापना झाली. ताऱ्यांचे तापमान आणि वर्णपट यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे कारण डॉ. मेघनाद साहा यांनी शोधून काढले होते. त्याच्या शोधामुळे वयाच्या २६ व्या वर्षी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली होती. वयाच्या ३४ व्या वर्षी ते रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ लंडनमध्ये निवडून आले. मेघनाद साहा हे खासदार ही होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील भौतिकशास्त्राला मोठी चालना मिळाली होती.  जन्म आणि शिक्षण प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा यांचा जन्म ६ ऑक्टोबर १८९३ रोजी पूर्व बंगालच्या ढाका जिल्ह्यातील सिओरताली नावाच्या गावात झाला. त्यांचे वडील जगन्नाथ साहा हे एक सामान्य व्यावसायिक होते. मेघनाद साहा यांचे प्राथमिक शिक्षण कलकत्ता (सध्याचे कोलकाता) येथे झाले. विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत पूर्व बंगालमधील विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा पहिला क्रमांक

नोबेल पारितोषिक 2020- वैद्यकशास्त्र

स्टॉकहोम या स्वीडन मधील शहरातील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल समितीने अमेरिकेतील हार्वे जे. अल्टर, चार्ल्स एम. राईस आणि ब्रिटन मधील मायकल हॉटन यांना संयुक्तपणे २०२० चे फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील लोकांमध्ये सिरॉसिस आणि यकृताचा कर्करोग निर्माण करणाऱ्या यकृतदाह (हिपेटायटिस) विरुद्धच्या लढाईत निर्णायक योगदान देणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे.  हार्वे जे. अल्टर, मायकल हॉटन आणि चार्ल्स एम. राईस यांनी लावलेल्या शोधामुळे 'हिपेटायटिस सी व्हायरस' हा नवा विषाणू ओळखण्यात आला. त्यांच्या कामापूर्वी हेपेटायटिस ए आणि बी विषाणूंचा शोध ही एक महत्त्वाची पावले होती, पण रक्तामुळे होणारा हिपेटायटिस नेमका कशामुळे होतो हे स्पष्टपणे सांगता आले नव्हते. हिपेटायटिस सी विषाणूच्या शोधामुळे जुन्या हेपेटायटिसच्या उर्वरित रुग्णांचे कारण उघड झाले आणि संभाव्य रक्त चाचण्या आणि नवीन औषधे यांनी लाखो लोकांचे प्राण वाचले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, हिपेटायटिसमुळे जगभरात दरवर्षी सात कोटींहून अधिक रुग्ण आणि चार लाख मृत्यूंची न

वेध २०३५- ऑनलाईन विज्ञान परीक्षा

"वेध २०३५" ------------ संशोधक बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी,        विज्ञानातील रुची वाढविण्यासाठी, विज्ञानाचा शालेय अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजण्यासाठी, मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेऊन येत आहे - "वेध २०३५"    ६ वी -७ वी आणि ८ वी - ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव ऑनलाईन विज्ञान परीक्षा   प्रवेश नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच लॉगीन करा - https://mavipa.org/vedh2035/ वेध 2035 लिखित मजकूर, व्हिडियो लेक्चर्स, विज्ञानातल्या संकल्पना स्पष्ट करणाऱ्या आणि घरच्या घरी करता येण्यासारख्या प्रयोगांचे व्हिडियो, विज्ञान कूटप्रश्न, विज्ञान खेळ अशा वैविध्यपूर्ण अभ्यास सामग्रीचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी  हा निरोप जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचवा... विज्ञानप्रसाराच्या या कार्यात सहभागी व्हा.  परीक्षेसाठी नावनोंदणी सुरु झाली आहे! नावनोंदणीची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२० अर्ज भरतांना पुढील प्रोमोकोड वापरावा: YJL03 अधिक माहितीसाठी संपर्क: दिपक आडगांवकर, 9860995257.

काप्रेकर- एक असामान्य गणिती

बऱ्याच जणांना गणित आवडत नाही पण गणितात खूप गमती जमती असतात. आज अशाच काही गमती आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या गमती काही विशिष्ट आकड्यांशी आणि एका व्यक्तीशी संबंधित आहेत. त्या व्यक्तीचं नाव दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर. हो बरोबर ऐकलंत तुम्ही, अगदी बरोबर! एक भारतीय, त्यातल्या त्यात मराठी आणि जागतिक स्तरावरील प्रसिद्ध गणिती. हे नाव खूप कमी लोकांना माहिती असेल कारण आमच्याकडे सर्व काही होतंच्या नादात खरंच जे काही होतं किंवा आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. चला तर मग सुरू करूयात एक चार अंकी संख्या मनात धरा जी वेगवेगळ्या अंकांची बनलेली आहे. उदा. 1234, 5961, 1937 किंवा 7391. आपण 1234 घेऊयात. आता ती अंकांच्या उतरत्या क्रमात लिहू- 4321 पुन्हा ती अंकांच्या चढत्या क्रमात लिहू- 1234 आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू - (4321-1234= 3087) आलेले उत्तर अंकांच्या उतरत्या क्रमात लिहू- 8730 परत त्या संख्येला चढत्या क्रमात लिहू - 0378 आता मोठ्या संख्येतून लहान संख्येला वजा करू - (8730 - 378 =8352) आलेले उत्तर अंकांच्या उतरत्या क्रमात लिहू - 8532 आता आलेले उत्तर अंकांच्या चढत्या क्रमात लिहू - 2358 परत म

ओळख शास्त्रज्ञांची- मायकेल फॅरडे

मायकेल फॅरडे, नाव ऐकलं आणि कार्य पाहिलं की अंगावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही. लोहाराकडे काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा, कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण नसतांना लंडनमधल्या एका पुस्तक विक्रेत्याकडे काम करतो. हे काम करत असताना खूप सारी पुस्तकं वाचून स्वत:च काही गोष्टी शिकतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला ब्रिटनचा सर्वोच्च खिताब देण्यात येतो, जो तो स्वतः नाकारतो. पुस्तकांच्या दुकानात जेन मार्सेटचं 'कन्वर्झेशन्स आॅन केमिस्ट्री' हे पुस्तक मायकेलच्या वाचनात येतं आणि रसायनशास्त्रानं तो भारावून जातो. त्याच वेळी लंडनमध्ये प्रसिद्ध ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ हंफ्री डेव्ही यांची व्याख्याने आयोजित केलेली असतात. कुणा एका व्यक्तीच्या मदतीने तो व्याख्यानांची तिकिटं मिळवतो आणि प्रभावित होऊन या व्याख्यानांच्या 300 पानांच्या नोट्स डेव्ही यांना पाठवतो. डेव्ही या नोट्स वाचून बाजूला ठेवतात पण साधारण एका वर्षभरानंतर एका प्रयोगादरम्यान हंफ्री डेव्ही यांना दृष्टीदोष होतो आणि मदतनीस म्हणून ते फॅरडेला बोलावतात. आपल्या ज्ञानाने आणि कामाने हळूहळू मायकेल त्यांचा विश्र्वास संपादन करतो. मायकेल फॅरडे यांचं

निओवाईज धुमकेतू

सुर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईज धूमकेतू पुन्हा पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागलाय. सध्या सोशल मीडियावर या धुमकेतूची खूप चर्चा सुरू आहे. हा धुमकेतू कसा पाहायाचा? तो साध्या डोळ्यांना दिसेल का? असे अनेक प्रश्न सध्या नेटीझन्स एकमेकांना विचारत आहेत. याच काही प्रश्नांची उत्तरं आम्ही पुढे दिली आहेत. 14 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंतचे 20 दिवस हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी महाराष्ट्रासह संपूर्ण पृथ्वीवासियांना लाभणार आहे. सुर्यास्तानंतर वायव्य दिशेला म्हणजेच उत्तर - पश्चिमेच्या आकाशात हा धूमकेतू पाहता येईल. सध्या देशात मान्सूनचं आगमन झाल्याने निरभ्र आकाश सापडणं दुर्मिळ आहे. मात्र, ही संधी उपलब्ध झाली तर हा दुर्मिळ धूमकेतू पाहणं सोडू नका. कारण, या 20 दिवसानंतर पुढची काही हजार वर्षं हा धूमकेतू दिसणार नाही. त्या आधी धूमकेतू म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊयात. धूमकेतू म्हणजे काय? धूमकेतू हे आपल्या सूर्यमालेचेच घटक असतात. 1997 साली आलेला हेल-बॉप हा धूमकेतू सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यानंतर 2007 मध्ये मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून दिसल

पुस्तक परिचय- 'जादूई वास्तव'

काल रिचर्ड डॉकिन्स यांनी लिहिलेलं व डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी भावानुवाद केलेलं 'जादूई वास्तव' हे पुस्तक वाचून झालं. काही पुस्तकं अशी असतात की संपल्यानंतर सुध्दा काहीतरी शिल्लक आहे अजून, पुन्हा-पुन्हा वाचायला हवं अशी हूरहूर लावून जातात. अगदी तसंच हे पुस्तक!  विवेक जागर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. विज्ञान आणि निसर्गाबद्दल कुतुहल असणाऱ्या कुणाही व्यक्तीनं वाचावं, खरं तर प्रेमात पडावं, असं पुस्तक आहे.  हे पुस्तक वाचावं किंवा वाचकाने यांच्या प्रेमात पडावं याची बरीचशी कारणं आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळ पुस्तकाचा केलेला हा भावानुवाद आहे. अनुवादित केलेली बरीच पुस्तकं असतात पण लेखकांचं म्हणणं तितक्याच प्रभावीपणे आणि तितक्याच ओघवत्या शैलीत वाचकांपर्यंत पोहोचवणं हे महाकर्मकठीण. मुळ पुस्तकातील संदर्भांना अनुसरून मायभाषेतील (प्रादेशिक) उदाहरणे, प्रसंगी काव्याची आणि आणि अभंगांची फोडणी देऊन मुळ ग्रंथाच्या तोडीसतोड साहित्यनिर्मिती (भावानुवाद) ही आणि अशी आणखी काही वैशिष्ट्ये या पुस्तकाची सांगता येतील. या पुस्तकाच्या गाभ्याविषयी

मराठी विज्ञानकथा संग्रह

मराठीतील काही विज्ञानकथा संग्रहांची यादी पाठवत आहे. ही यादी मला फेसबुकवरील एका कमेंट बॉक्समध्ये मिळाली. आतापर्यंत यातील अगदीच थोडी पुस्तके माझ्या वाचनात आली आहे पण जी काही वाचली आहेत ती अतिशय उत्तम, रसाळ आणि खिळवून ठेवणारी आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून जर आपल्याला ही पुस्तके मिळत असतील तर नक्की वाचावीत.  गर्भार्थ - (लेखक - बाळ फोंडके ) दृष्टीभ्रम ( लेखक - बाळ फोंडके ) दुसरा आइन्स्टाईन (लेखक - लक्ष्मण लोंढे ) यक्षाची देणगी (लेखक - जयंत नारळीकर) अंतराळातील भस्मासूर ( लेखक - जयंत नारळीकर)  सायबर कॅफे (लेखक - बाळ फोंडके)  कालवलय (लेखक - बाळ फोंडके) द्विदल ( लेखक - बाळ फोंडके ) यंत्रलेखक (लेखक - निरंजन घाटे) भविष्य वेध (लेखक - निरंजन घाटे )  दॅट क्रेझी इंडियन ( लेखक - निरंजन घाटे)  स्पेसजॅक (लेखक - निरंजन घाटे)  वामनाचे चौथे पाऊल ( लेखक - सुबोध जावडेकर) मृत्यूदूत (लेखक - निरंजन घाटे) यंत्रमानवाची साक्ष (लेखक - निरंजन घाटे)  गोलमाल ( लेखक - बाळ फोंडके) खिडकीलाही डोळे असतात ( लेखक - बाळ फोंडके) जीवनचक्र (लेखक - निरंजन घाटे )  स्वप्नचौर्य (लेखक - निरंजन घाटे)  आकाशभाकीते ( लेखक - सुबोध जावडेक

गोलाकार इंद्रधनुष्य

सूर्याभोवती गोलाकार इंद्रधनुष्य दिसणे म्हणजे पर्वणीच. कालच्या सुर्यग्रहणानंर आज सकाळी आडगांव ता. भोकरदन जि. जालना येथून हे दृश्य दिसले.  अशाप्रकारचे दृश्य ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांमधून होणार्या प्रकाशाच्या अपस्करणानंतर दिसून येते. इंग्रजीत याला हॅलो असे म्हणतात. सिरस किंवा सिरोस्ट्रॅटस या प्रकारच्या ढगांमध्ये मुख्यतः बर्फाची स्फटिकं असतात, या षटकोनी आकाराच्या स्फटिकांमधून प्रकाश जात असताना, तो 22 ° कोनात वाकलेला असतो या स्फटिकांमधून बाहेर पडताना या प्रकाशाचे अपस्करण होऊन सूर्याभोवती गोलाकार प्रभामंडप तयार करतो. या विशिष्ट प्रकारच्या इंद्रधनुष्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे यामधील रंगाचा क्रम हा साधारण इंद्रधनुष्यातील रंगांच्या अगदी उलट असतो. या इंद्रधनुष्याच्या आतील बाजूस लाल रंग तर बाहेरील बाजूस जांभळा रंग असतो. या रंगक्रमाच्या उलट होण्यामागे बर्फाच्या स्फटिकांतर्गत दोनदा होणारे प्रकाशाचे परावर्तन हे आहे.  अगदी सुरुवातीच्या काळात हवामानाच्या अंदाजासाठी यांचा उपयोग होत असे. असं सांगितलं जातं की या प्रकारचा प्रभामंडप म्हणजे पावसाची नांदी होय. या दृश्यानंतर चोवीस तासात पाऊस

अयनदिनी सुर्यग्रहण

दरवर्षी 21 जून रोजी सुर्याचे दक्षिणायन सुरू होते. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे होणारे सुर्याचे भासमान भ्रमण यांस कारणीभूत असते. कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे सुर्य सरकतोय असा भास व्हायला सुरूवात होते. पृथ्वीवरील ऋतुचक्रासही ही घटना कारणीभूत ठरते. खरे तर वर्षातनं दोनदा अयन दिन असतात. एक म्हणजे 21 जून ज्या दिवशी कर्कवृत्तावरून सुर्याचे दक्षिणायन सुरू होते तर दुसरे म्हणजे 22 डिसेंबर ज्या दिवशी मकरवृत्तावरून सुर्याचे उत्तरायण सुरू होते. पण याच दिवशी म्हणजे अयन दिनाच्या दिवशी सुर्यग्रहण होणे ही तशी काही नेहमीची घटना नाही.  वर्षातनं दोनदा अयन दिन त्याचबरोबर महिन्यातनं दोनदा एकतर अमावस्या किंवा पौर्णिमा हे लक्षात घेऊन बघितले असता अयन दिनाच्या वेळी पौर्णिमा किंवा अमावस्या सात ते आठ वर्षातनं एकदा असण्याची शक्यता असते. पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण किंवा प्रत्येक अमावस्येला सुर्यग्रहण होतेच असे नाही याचं कारण म्हणजे प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सुर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत असले तरी एकाच प्रतलात नसतात. या आधी 2001 साली व त्या आधी 1982 साली 21 जून या अयनदिनी सुर

गुलाबी लोणार सरोवर

गेल्या एक-दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे चर्चेचा विषय ठरले आहे याचं कारण म्हणजे लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदललेला दिसतोय. एरवी निळेशार दिसणारे पाणी चक्क गुलाबी दिसायला लागले आहे. याबाबत तुर्तास कोणताही निष्कर्ष काढणे कठीण असले तरी काही तर्क मात्र तज्ञांकडून लावले जात आहे. लोणार सरोवरातील पाण्यात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या बुरशीची वाढ जास्त प्रमाणात झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते निसर्ग चक्रीवादळामुळे झालेला वातावरणातील बदल आणि सरोवरातील पाण्याची खालावलेली पातळी ही यासाठी कारणीभूत ठरली असावी. लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे 52000 वर्षांपूर्वी 20 लाख टन वजनाच्या व 90000 किलोमीटर प्रती तास या वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळलेल्या उल्कापातामुळे झाली आहे. लोणार सरोवराचा आकार हा अंडाकृती असून साधारणपणे 1200 मीटरचा व्यास व 137 मीटर खोलीचे तळे या उल्कापातामुळे तयार झाले आहे. लोणार सरोवरातील पाणी हे खारं असून ते अल्कलीधर्मी आहे. लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचं आणि उल्कापातामुळे तयार झालेलं (हे दोन्ही गुणधर्

दुहेरी इंद्रधनुष्य

काल दुपारनंतर झालेल्या पावसाने दिल्लीकरांना दुहेरी आनंद दिला. एक म्हणजे गरमीच्या तडाख्यातून थोडासा थंडावा मिळाला आणि दुसरे म्हणजे दुहेरी इंद्रधनुष्याचे दर्शन झाले. तसे पाहता दुहेरी इंद्रधनुष्य ही काही आश्चर्याची गोष्ट नसली तरी ती नेहमीच दिसते असेही नाही त्यामुळे त्याबद्दल नवल ते कायम असते. प्रकाशाचे काही गुणधर्म असतात जसे की परावर्तन, अपवर्तन, अपस्करण इ. या सर्व गुणधर्मांचा एकत्रित परिपाक म्हणजे इंद्रधनुष्य होय. प्रकाशकिरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतांना माध्यमबदलामुळे स्वतःचा मार्ग बदलतात आणि थेंबाच्या मागील पृष्ठभागावरून परावर्तित होतात. एकदा परावर्तित झालेले किरण थेंबातून बाहेर पडताना पुन्हा एकदा माध्यमबदलामुळे स्वतःचा मार्ग बदलतात. या प्रत्येक प्रक्रियेमध्ये सुर्यकिरणांतील विविध तरंगलांबीच्या प्रकाशाचे अपवर्तन आणि परावर्तन वेगवेगळ्या कोनांतून होत असल्याने सात तरंगलांबीचे रंग वेगवेगळे होतात आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. आता गंमत अशी आहे की काही वेळा पाण्याच्या थेंबामध्ये प्रकाशाचे परावर्तन एकदा न होता दोनदा होते. सुर्य क्षितिजापासून जवळ म्हणजे खूप खाली असेल तेव्हा असं

एक यार्ड म्हणजे नेमकं काय आणि किती?

यार्ड हे लांबी मोजण्याचे एक एकक आहे जे इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. हे एकक वापरण्याची नेमकी सुरूवात कधी झाली ते सांगता नसलं तरी ती इंग्लंडमध्येच झाली हे नक्की. याबाबत एक गोष्ट प्रसिध्द आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून लांबी-रुंदी मोजण्यासाठी हातांचा, पायांचा, बोटांचा वापर होत आलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून माणसाच्या कमरेचं माप म्हणजेच एक यार्ड असं मानलं जात असे पण प्रत्येकाच्या कमरेचं माप वेगळं असतं, मग कुणाच्या कमरेचं माप मोजायचे?  इसवी सनाच्या बाराव्या शतकात एक यार्ड म्हणजे नेमकं किती हा प्रश्र्न पुढे आला त्यावेळी राजा पहिला हेन्री हा इंग्लंडवर राज्य करीत होता. त्याने असं जाहीर केलं की त्याच्या नाकाच्या शेंड्यापासून नाकासमोर सरळ धरलेल्या हाताच्या अंगठ्यापर्यंंतच्या अंतराएवढे माप म्हणजेच एक यार्ड होय. ही पध्दत साधारण सहाशे वर्षे वापरली गेली. पुढे 1866 पासून लंडनमधील ट्राफल्गार चौकातील कास्याच्या पट्टीच्या लांबी वरून एक यार्ड अंतर मोजले जाते. अमेरिकेत एक यार्ड म्हणजे 0.9144 मीटर तर आपल्याकडे एक यार्ड म्हणजे 91.44 सेंटीमीटर म्हणजे साधारणपणे तीन फूट मानले जाते.

अर्थपूर्ण विज्ञानकथा- मुर्ख गाढवं- आयझॅक आसिमॉव्ह

आयझॅक आसिमॉव्ह यांचं विज्ञानाशी संबंधित लिखाण हे जगप्रसिद्ध आहे. विज्ञानातील संकल्पना अगदी सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगंं आहेच पण वैज्ञानिक कथांच्या माध्यमातून वाचकांना खिळवून ठेवण्याचं सुद्धा सामर्थ्य त्यांच्या लिखाणात आहे. त्यांच्या रोबोटिक्सशी संबंधित शंभराहून अधिक कथा प्रकाशित आहे पण रोबोटिक्स सोडूनही काही उत्कृष्ट कथा त्यांनी लिहिलेल्या आहे, त्यातील एका कथेबाबत कथेचा काळ हा लिखाणाच्या काळाशी मिळता जुळता आहे. फेब्रुवारी 1958 साली प्रकाशित या कथेत पृथ्वीवरील मानवाने अणुंच्या विभाजनाचे तंत्र आत्मसात केलं आहे पण अवकाशगमनाचं तंत्र मात्र त्याच्या हातात नाही.  एका दीर्घायू राजन्य जमातीतील नॅरोन या दीर्घिका निबंधकाचे अवकाशातील तारा मंडळातील जमातीच्या नोंदी ठेवणे तसेच त्यांचं बुध्दीमान व प्रगल्भ या गटांत वर्गीकरण करणे हे काम असतं. जेव्हा त्याला पृथ्वीवरील मानव जमातीच्या अणुंच्या विभाजनाचे तंत्रज्ञान कळते तेव्हा तो मानवजातीच्या पुढे बुध्दीमान लिहतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की यांना अवकाशगमनाचं तंत्र अवगत नाही आणि यांनी स्वतःच्या ग्रहावरच अणुचाचणी केली आहे तेव्हा

शोधांच्या गोष्टी- नेपच्यूनचा शोध

विल्यम हर्षल यांना 13 मार्च 1781 रोजी स्वतः बनवलेल्या दुर्बिणीच्या सहाय्याने अवकाश निरीक्षण करतांना युरेनस या ग्रहाचा शोध लागला. या शोधाबरोबरच खगोलशास्त्रात एक समस्या उभी राहिली. न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार युरेनसची भ्रमणकक्षा आणि त्याची प्रत्यक्ष भ्रमणकक्षा यांत तफावत आढळून येत होती. हे असं का होतं असावं? न्युटनचा नियम तर चुकला नसेल ना? युरेनस असं का वागत असेल? असे प्रश्न उपस्थित झाले. बरीच लोकं यावर काम करत होती. सर्व बाजूंनी विचार करून कुणालाही उत्तर मिळत नव्हते.  1841 साली केंब्रिज विद्यापीठात खगोलशास्त्र शिकणाऱ्या जॉन अॅडम्स या विद्यार्थ्याला मात्र न्युटनच्या नियमावर विश्वास होता. त्याला असं वाटलं की युरेनसच्या भ्रमणकक्षेवर परिणाम करणारं एखादं गुरूत्वबल ग्रहाच्या स्वरूपात असावं आणि न्युटनच्या नियमाप्रमाणेच ते युरेनसवर कार्य करत असावं. मग या भल्या मोठ्या अवकाशात तो ग्रह शोधायचा कसा? यावर त्यानं वेगळीच शक्कल लढवली. त्याच्या मते या ग्रहावर सुर्य, गुरू, शनी व युरेनस यांचं गरूत्वबल कार्यरत असेल मग त्यानं सुर्यापासून या ग्रहांची अंतरं बघितली असता एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्य

वैज्ञानिकांचे प्रयोग- ओलस रोमर आणि प्रकाशाचा वेग

गॅलिलिओच्या प्रकाशाचा वेग मोजण्याचा फसलेला प्रयोग आपण बघीतला यानंतर 40 वर्षांच्या आतच डच खगोलनिरीक्षक ओलस रोमर याने गुरूच्या चंद्रग्रहणावरून प्रकाशाचा वेग मोजला पण तो काही प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी प्रयोग करत नव्हता. मग हा शोध कसा लागला ते जाणून घेऊया. 1610 साली गॅलिलिओने दुर्बिणीच्या सहाय्याने गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला. या उपग्रहांच्या कक्षा व त्यांचा गुरू भोवतीचा परिभ्रमणकालावधी मोजून आपल्याला अंतराळातील घड्याळ शोधता येईल असा अंदाज गॅलिलिओने बांधला होता. या घड्याळाची तुलना स्थानिक सौरघड्याळाशी करून समुद्रातील जहाजांचे रेखावृत्तीय स्थान शोधता येईल असेही अंदाज 17 व्या शतकात बांधले जात होते पण या प्रयत्नांना यश येत नव्हते. पुढे घड्याळांचा शोध लागल्यावर हे प्रयत्न सुध्दा बंद झाले पण रोमर यांनी बरीच वर्ष अथक मेहनतीने गुरूच्या लो या उपग्रहाच्या केलेल्या निरीक्षणांनी प्रकाशाचा वेग मोजण्यासाठीची योग्य पध्दत शोधली. वर्षानुवर्षे गुरूच्या उपग्रहाच्या निरिक्षणांवरून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट त्यांच्या लक्षात आली ती म्हणजे गुरूच्या लो या चंद्रग्रहणाचा कालावधी वर्षभर सारखा नसतो. पृथ्वी आणि ग

गुरूत्व स्थिरांक

न्युटनचा गुरूत्वाकर्षणाचा नियम आपल्याला माहीत आहे. खूप वेळा आपण त्याचं गणितीय सूत्र वाचलेलं असतं पण यातील गुरूत्व स्थिरांक (G) म्हणजे काय? ते कशाचं मापन आहे आणि नेमकं ते का आणि कुठून आलं हे आपल्या लक्षात येतेच असं नाही. भौतिकशास्त्रातील जाणकारांना ते नक्कीच माहिती असेल तरीही... गुरूत्व स्थिरांकाचे एकक हे [m3/(kg.s2)] आहे. यातील घनमीटर/किलोग्राम हा भाग घनतेचा व्यस्त आहे. घनता म्हणजे एखाद्या पदार्थाचा घट्टपणा मोजण्याचे एकक तर त्याचा व्यस्त म्हणजे त्या पदार्थाचा सैलसरपणा. यापुढील भाग म्हणजे 1/s2 हा तो पदार्थ किती लवचिक किंवा परिवर्तनशील आहे याचं मापन होय. थोडक्यात गुरूत्वस्थिरांक हा कठल्यातरी पदार्थाच्या सैलसरपणाची परिवर्तनशीलता मोजतो. मग कुठला पदार्थ? असा प्रश्र्न येतो तेव्हा ज्या वस्तुंच्यामधलं गुरुत्वाकर्षण आपण मोजतो आहोत त्यांच्या आसपासचे अवकाश जे आपल्या माहितीप्रमाणे सतत प्रसरण पावते आहे.  म्हणजे गुरूत्व स्थिरांक हा अवकाशाच्या सैलसरपणाच्या परिवर्तनशीलतेचं (घनता व प्रसरण) मापन करतो हे आपल्या लक्षात येईल. या गुरूत्व स्थिरांकाची किंमत काढण्यासाठी हेन्री कॅव्हेन्डीश यांनी एक खूप छान प्रय

वैज्ञानिकांचे प्रयोग- बॉईलचा नियम

पुर्वीच्या काळी रसायनशास्त्र हे मुळातच खालच्या दर्जाचं मानलं जात असे याचं कारण म्हणजे बरीच लोकं कुठल्यातरी पदार्थांवर काहीतरी प्रक्रिया करून परिस, सोनं किंवा अमृत बनवता येईल यांसारख्या अशक्य आणि बावळट गोष्टीच्या मागे लागले होते. या जंजाळातून रसायनशास्त्राला आधार देत बाहेर काढण्याचं महत्त्वपूर्ण काम रॉबर्ट बॉईल यांनी केलं. 1657 साली हवा आणि निर्वात पोकळीचा अभ्यास करत असतांनाच 1643 साली टॉर्सेलीने निर्वात पोकळीचा स्त्रोत शोधण्यासाठी केलेल्या प्रयोगाकडे त्यांचं लक्ष गेलं.  टॉर्सेलीच्या प्रयोगात वायुदाबमापकाचा शोध लागला होता. पुर्णपणे पाऱ्याने भरलेली काचेची नळी पारा असलेल्या पात्रात उलटी ठेवली असता त्या नळीतील पाऱ्याची पातळी कमी होत पात्रातील पाऱ्याच्या पातळीपासून 760 मि. मी. अंतरावर स्थिर होत होती. यावरून हवेचा दाब 760 मि. मी. पाऱ्याच्या पातळी एवढा असुन तोच नळीत निर्वात पोकळी निर्माण होण्यास कारणीभूत आहे हे दिसून येत होते. याच काळात आणखी एका शोधाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले तो म्हणजे 1654 साली अॉटो व्हॉन ग्युरिक यांनी शोधलेला निर्वात पंप. या पंपाबाबत रॉबर्ट हूक यांच्याशी चर्चा करून हूक यां

वैज्ञानिकांचे प्रयोग- इरॅस्टोस्थेनीस

इसवी सन पूर्व 276 साली इजिप्तमधील अलेक्झांड्रीया या शहरात जन्मलेले इरॅस्टोस्थेनीस हे गणितज्ञ, भूगोलतज्ञ, कवी, खगोलशास्त्र अभ्यासक व त्याचबरोबर संगीताची उत्तम जाण असलेलं व्यक्तिमत्व होतं. गणितातील विचारलेल्या संख्येपर्यंतच्या मुळसंख्या शोधण्याची प्रणाली त्यांनी विकसित केली होती जी आजही संगणकांमध्ये वापरली जाते. भूगोलामध्ये त्यांचं योगदान हे कायमस्वरूपी न विसरण्याजोगं आहे. जिओग्राफी ही संज्ञा वापरायला सुरूवात त्यांनीच केली होती, सर्वप्रथम पृथ्वीच्या कललेल्या आंसाचे माप त्यांनीच गणले, पृथ्वीच्या परिघाच्या मापाचा पहिला लिखित पुरावा हा त्यांच्याच नावे सापडतो, सुर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराची त्यांनी गणना केली याचबरोबर लीप दिवसाचा शोध सुध्दा त्यांनी लावला. पृथ्वीचा परिघ त्यांनी कसा मोजला? अन्य ग्रीक विचारवंताप्रमाणे पृथ्वी ही गोल आहे हे त्यांना मान्य होते. आजच्या आस्वान शहरातील, म्हणजे त्याकाळातील साईन शहरातील एका विहिरीत वर्षातील एका विशिष्ट दिवशी दुपारी भिंतींची सावली पाण्यावर पडत नाही हे सुध्दा ते ऐकून होते. त्यांनी अलेक्झांड्रीया शहर व साईन शहरातील ती विहीर हे अंतर मोजले. त्याचबरोबरीने

विद्युत चुंबकाचा शोध

इसवी सन 1820 साली एके दिवशी हॅन्स ओरेस्टेड या शास्त्रज्ञाला आपल्या प्रयोगशाळेत दिशादर्शक उत्तर दक्षिण दिशा दाखवत नसल्याचे लक्षात आले. संपूर्ण प्रयोग शाळेतील सफाई करून व इतर सर्व काही शोधूनही उत्तर सापडत नसल्याने शेवटी कंटाळून प्रयोगशाळेतून बाहेर जात असताना व प्रयोग शाळेतील सर्व उपकरणे बंद करत असताना शेवटचे बटन बंद केल्यावर चुंबक सूची बरोबर उत्तर दक्षिण दिशा दाखवत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि यावरून विद्युत प्रवाहासोबत चुंबकीय क्षेत्र नेहमी अस्तित्वात असतं हा शोध लागला.

राष्ट्रीय विज्ञान दिन

28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 1986 साली राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषदेच्या सुचनेवरून भारत सरकारने सर सी. व्ही. रामन यांच्या संशोधन प्रकल्प सादरीकरणाच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. 1987 साली परिषदेतर्फे विज्ञान संवाद व विज्ञान प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय विज्ञान प्रसार पुरस्कार जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी समाजामध्ये दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व रूजणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होणे, मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयत्न, धडपड व त्यांचे शोध यांच्या प्रदर्शनासाठी तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवं तंत्रज्ञान व नवीन आव्हाने यांची चर्चा करण्यासाठी, विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती आणि त्याचबरोबर विज्ञान प्रसार व प्रचारासाठी विज्ञान दिन साजरा केला जातो.  दरवर्षी एखाद्या विशिष्ट विषयाला धरून  सार्वजनिक व्याख्याने, रेडिओ, टीव्हीवर विविध कार्यक्रम, विज्ञान विषयक चित्रपट, विज्ञान प्रदर्शनं, वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्