मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

थॉमस अल्वा एडिसन

थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्यांचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.



जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.



फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.



एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.



१८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.



एडिसन यांचे १८ ऑक्टोबर १९३१ ला अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये निधन झाले, तेव्हा त्यांच्या नावावर १०२९ विविध उपकरणांची पेटंट्स होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्...