रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने दिनांक ७ ऑक्टोबर २०२० रोजी फ्रान्सच्या इमॅन्युएल शार्पेंची आणि अमेरिकेची जेनफिर डाउडना यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर केले. विज्ञानाचे नोबेल पारितोषिक महिला संघात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यांनी लावलेल्या शोधाचा वापर करून संशोधक अत्यंत अचूकतेने प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा डीएनए बदलू शकतात," असे नोबेल ज्युरींनी सांगितले.
संशोधन
मानवी शरीरातील काही व्याधी या अनुवांशिक असतात यासाठी आपल्या आई-वडिलांकडून प्राप्त जनुकं कारणीभूत असतात. ही जनुकं आपल्या शरीरातील पेशींमध्ये विविध प्रथिनांच्या निर्मितीत सहभागी असतात. निर्माण झालेली प्रथिनं शरीरात वेगवेगळी कार्ये करतात. काही वेळा आपल्या पेशींमधील जनुकांमध्ये विकृती होऊन व्याधीस कारणीभूत प्रथिनांची निर्मिती होते तर काही वेळा आवश्यक प्रथिनांच्या निर्मितीस कारणीभूत जनुकंच आपल्या पेशीत नसतात.
अशावेळी आवश्यक जनुकं डीएनएच्या साखळीमध्ये योग्य ठिकाणी बसवणे किंवा अनावश्यक जनुकं काढून टाकणे आवश्यक ठरते. यालाच जनुकीय तंत्रज्ञान असं म्हणतात. यासाठी योग्य त्या ठिकाणी डीएनए साखळी तोडणारे रेणू (जनुकीय कात्री) उपयोगी ठरतात. याच प्रकारच्या जनुक तंत्रज्ञानाच्या सर्वात तीक्ष्ण साधनांपैकी एक शोधण्यासाठी रसायनशास्त्र २०२० मधील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे: क्रिसपीआर/कॅस९ जनुकीय कात्री. संशोधक याचा उपयोग अत्यंत अचूकतेने प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा डीएनए बदलण्यासाठी करू शकतात.
या शोधाने रेण्वीय जैवविज्ञानात क्रांती घडवून आणली आहे, वनस्पतींच्या प्रजननाच्या नव्या संधी आणल्या आहेत, नावीन्यपूर्ण कर्करोग उपचारांना हातभार लावत आहे आणि वारशाने मिळालेले रोग बरे करण्याचे स्वप्न या शोधामुळे साकार होऊ शकते.
अनपेक्षित शोध
क्रिसपीआर-कॅस९ नावाची जनुकीय कात्री हा असाच एक अनपेक्षित शोध आहे ज्यात विलक्षण क्षमता आहे
इमॅन्युएल शार्पेंची आणि जेनफिर डाउडना यांनी स्ट्रेप्टोकोकस जीवाणूंच्या रोगप्रतिकारक प्रणालीची तपासणी सुरू केली तेव्हा एक कल्पना अशी होती की ते प्रतिजैविकांचा नवा प्रकार विकसित करू शकतील.
त्याऐवजी त्यांच्या हाती एक रेण्वीय साधन लागले जे जनुकीय पदार्थांमध्ये अचूक पणे कात्री म्हणून वापरले जाऊ शकते आणि त्यामुळे जीवनाची संहिता सहज बदलणे शक्य होते. हा शोध लागल्यानंतर अवघ्या आठ वर्षांनी या जनुकीय कात्रीने जैवविज्ञानाला आकार दिला आहे. जैवरसायनशास्त्रज्ञ आणि पेशी जीवशास्त्रज्ञ आता वेगवेगळ्या जनुकांची कार्ये आणि रोगाच्या वाढीमध्ये त्यांची संभाव्य भूमिका यांचे सहज संशोधन करू शकतात.
उपयोग
या शोधाचा उपयोग वनस्पतींना विशिष्ट वैशिष्ट्ये देण्यासाठी जसे की उष्ण हवामानात दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता केला जाऊ शकतो. वैद्यकशास्त्रात, ही जनुकीय कात्री नवीन कर्करोग उपचार आणि वारशाने मिळालेले रोग बरे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राथमिक अभ्यासात महत्त्वाचे योगदान देत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा