मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

नोबेल पारितोषिक 2020- भौतिकशास्त्र

नोबेल समितीने भौतिकशास्त्राचे २०२० चे नोबेल पारितोषिक रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अँड्रिया गेज यांना देण्याचे जाहीर केले.

नोबेल पुरस्कार जगभरात प्रतिष्ठेचा समजला जातो. हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

रॉजर पेनरोज यांनी व्यापक सापेक्षतेच्या सिद्धांताच्या साहाय्याने कृष्णविवराच्या निर्मितीचे भविष्य वर्तवता येऊ शकते असे संशोधनातून दाखवून दिले. तर, गेंजेल आणि गेज यांना आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या एका प्रचंड कृष्णविवराच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.

कृष्णविवर

एखाद्या ताऱ्यातील इंधन संपले असता स्वतःच्या गुरूत्वाकर्षणाने तो तारा आकुंचन पावू लागतो, त्याचं आकारमान कमी होत जातं आणि त्याचं रूपांतर अनंत घनता असलेल्या एका विवरात होतं. नगण्य असं आकारमान व अनंत घनता यामुळे याचं गुरूत्वाकर्षण इतकं जास्त असते की याच्या सानिध्यात आलेली या विश्वातील कुठलीही वस्तु, ऊर्जा अगदी प्रकाशसुध्दा याकडे आकर्षित होतो व एकदा आत गेल्यानंतर कालांतराने बाहेर पडूच शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला हे विवर दिसू शकत नाही गुरूत्वाकर्षणामुळे त्याचं अस्तित्व फक्त जाणवतं.

 

रॉजर पेनरोझ यांचं योगदान

रॉजर पेनरोझ यांनी अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतेच्या सिध्दांतावरून एखाद्या ताऱ्यातील इंधन संपले असता तो तारा अनंत घनता असलेल्या शून्य आकाराच्या बिंदूमध्ये कोसळू शकतो हे गणिताचा वापर करून सिध्द केले. या बिंदूला ते 'सिंग्युलॅरिटी' म्हणत असत.

रॉजर पेनरोझ यांनी अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतेच्या व्यापक सिद्धान्ताचा शोध घेण्यासाठी गणिती पद्धतींचा शोध लावला. त्यांनी दाखवून दिले की या सिद्धान्तामुळे कृष्णविवरांची निर्मिती होते, कालांतराने ही महाकाय कृष्णविवरं त्यांच्यात प्रवेश करणारे सर्व काही गिळंकृत करतात.

प्रोफेसर गेंजेल आणि प्रोफेसर गेज यांचं योगदान

रेनहार्ड गेंजेल आणि अँड्रिया गेज यांना असे आढळून आले की एक अदृश्य आणि अत्यंत जड वस्तू आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ताऱ्यांच्या कक्षांवर नियंत्रण ठेवते. प्रचंड कृष्णविवर हे सध्या ज्ञात असलेले या घटनेचे एकमेव स्पष्टीकरण आहे. 

प्रोफेसर गेंजेल आणि प्रोफेसर गेज यांच्या नेतृत्वाखाली खगोल निरीक्षकांचे दोन स्वतंत्र गट सुमारे तीन दशकांपासून आकाशगंगेच्या केंद्रस्थानी लक्ष ठेवून होते. ते आकाशगंगेच्या केंद्राजवळील सागिटारियस ए या कॉम्पॅक्ट रेडिओ स्रोताचा अभ्यास करत होते. सागिटारियस ए आता आपल्याला एक प्रचंड कृष्णविवर म्हणून माहीत आहे. सागिटारियस ए* २५,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

१९०३ साली मेरी क्युरी, १९६३ मध्ये मारिया गोपर्ट-मेयर आणि २०१८ मध्ये डोना स्ट्रिकलँड नंतर भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेली गेज ही चौथी महिला आहे.

"मला आशा आहे की मी इतर तरुणींना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देऊ शकेन. हे असे क्षेत्र आहे ज्यात खूप मज्जा आहे, आणि जर तुम्ही विज्ञानाबद्दल आग्रही असाल तर बरंच काही करता येईल," असं प्रोफेसर गेज पुरस्कार जाहीर झाल्यानंतर म्हणाल्या.

नोबेल समितीने म्हटले की कृष्णविवरांमुळे "अजूनही अनेक प्रश्न आहेत जे उत्तरांसाठी आसुसलेले आहेत आणि भविष्यातील संशोधनाला प्रेरणा देणारे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्याच पिवळ्या रंगाचा प्रका

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्दल बरेच किस्से

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)