मुख्य सामग्रीवर वगळा

एक यार्ड म्हणजे नेमकं काय आणि किती?

यार्ड हे लांबी मोजण्याचे एक एकक आहे जे इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. हे एकक वापरण्याची नेमकी सुरूवात कधी झाली ते सांगता नसलं तरी ती इंग्लंडमध्येच झाली हे नक्की. याबाबत एक गोष्ट प्रसिध्द आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून लांबी-रुंदी मोजण्यासाठी हातांचा, पायांचा, बोटांचा वापर होत आलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून माणसाच्या कमरेचं माप म्हणजेच एक यार्ड असं मानलं जात असे पण प्रत्येकाच्या कमरेचं माप वेगळं असतं, मग कुणाच्या कमरेचं माप मोजायचे? 
इसवी सनाच्या बाराव्या शतकात एक यार्ड म्हणजे नेमकं किती हा प्रश्र्न पुढे आला त्यावेळी राजा पहिला हेन्री हा इंग्लंडवर राज्य करीत होता. त्याने असं जाहीर केलं की त्याच्या नाकाच्या शेंड्यापासून नाकासमोर सरळ धरलेल्या हाताच्या अंगठ्यापर्यंंतच्या अंतराएवढे माप म्हणजेच एक यार्ड होय. ही पध्दत साधारण सहाशे वर्षे वापरली गेली.
पुढे 1866 पासून लंडनमधील ट्राफल्गार चौकातील कास्याच्या पट्टीच्या लांबी वरून एक यार्ड अंतर मोजले जाते.
अमेरिकेत एक यार्ड म्हणजे 0.9144 मीटर तर आपल्याकडे एक यार्ड म्हणजे 91.44 सेंटीमीटर म्हणजे साधारणपणे तीन फूट मानले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

मोबाईलची बॅटरी 100% झाल्यावर चार्जिंगला लावून ठेवली तर काय होते?

“मोबाईलची बॅटरी 100% झाली आहे, आता चार्जर काढ!” आपण घरात ही सूचना अनेकदा ऐकतो. पण खरंच 100% चार्ज झाल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला तर बॅटरी खराब होते का? मोबाईलचा स्फोट होऊ शकतो का? की आधुनिक मोबाईल स्वतःच चार्जिंग नियंत्रित करतात? चला, या रोजच्या जीवनातील प्रश्नामागचे विज्ञान समजून घेऊया!  सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट... आजच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन (Lithium-ion) किंवा लिथियम-पॉलिमर (Lithium-polymer) बॅटरी वापरली जाते. या बॅटरीमध्ये चार्जिंगचे नियंत्रण करणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असते. त्यामुळे बॅटरी 100% झाल्यानंतर चार्जर पूर्वीसारखा सतत मोठ्या प्रमाणात विद्युतप्रवाह बॅटरीमध्ये ढकलत राहात नाही. म्हणजेच— “100% झाल्यावरही बॅटरीमध्ये सतत वीज भरत राहते” — हे योग्य नाही. मात्र याचा अर्थ 100% चार्ज झाल्यावर मोबाईल कायम चार्जिंगला ठेवणे पूर्णपणे चांगले आहे, असेही नाही. मग नेमके काय होते? 100% झाल्यावर चार्जिंग कसे नियंत्रित होते? मोबाईलमध्ये बॅटरीचे तापमान, व्होल्टेज आणि चार्जची स्थिती तपासणारी Battery Management System (BMS) किंवा संबंधित चार्जिंग नियं...

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...