आयझॅक आसिमॉव्ह यांचं विज्ञानाशी संबंधित लिखाण हे जगप्रसिद्ध आहे. विज्ञानातील संकल्पना अगदी सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगंं आहेच पण वैज्ञानिक कथांच्या माध्यमातून वाचकांना खिळवून ठेवण्याचं सुद्धा सामर्थ्य त्यांच्या लिखाणात आहे. त्यांच्या रोबोटिक्सशी संबंधित शंभराहून अधिक कथा प्रकाशित आहे पण रोबोटिक्स सोडूनही काही उत्कृष्ट कथा त्यांनी लिहिलेल्या आहे, त्यातील एका कथेबाबत
कथेचा काळ हा लिखाणाच्या काळाशी मिळता जुळता आहे. फेब्रुवारी 1958 साली प्रकाशित या कथेत पृथ्वीवरील मानवाने अणुंच्या विभाजनाचे तंत्र आत्मसात केलं आहे पण अवकाशगमनाचं तंत्र मात्र त्याच्या हातात नाही.
एका दीर्घायू राजन्य जमातीतील नॅरोन या दीर्घिका निबंधकाचे अवकाशातील तारा मंडळातील जमातीच्या नोंदी ठेवणे तसेच त्यांचं बुध्दीमान व प्रगल्भ या गटांत वर्गीकरण करणे हे काम असतं. जेव्हा त्याला पृथ्वीवरील मानव जमातीच्या अणुंच्या विभाजनाचे तंत्रज्ञान कळते तेव्हा तो मानवजातीच्या पुढे बुध्दीमान लिहतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की यांना अवकाशगमनाचं तंत्र अवगत नाही आणि यांनी स्वतःच्या ग्रहावरच अणुचाचणी केली आहे तेव्हा तो त्याने नुकत्याच केलेल्या नोंदीवर काट मारतो आणि उद्गारतो, "मुर्ख गाढवं"
या अगदी छोट्याशा गोष्टीतनं मानवाच्या चुका आणि मुर्खपणावर नेमकेपणानं बोट ठेवण्याचं काम आयझॅक आसिमॉव्ह यांनी केलं आहे.
(मुळ गोष्ट वाचण्यासाठी गुगलवर Silly Asses by Isaac Asimov सर्च करा किंवाhttps://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://nyc3.digitaloceanspaces.com/sffaudio-usa/usa-pdfs/SillyAssesByIsaacAsimov.pdf&ved=2ahUKEwi9qN-9-sToAhU94XMBHQbdCc4QFjAJegQICxAB&usg=AOvVaw01Doi8cEIJo8SkGKHGQdJU या लिंकवरून pdf डाऊनलोड करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा