मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

ओळख शास्त्रज्ञांची- मायकेल फॅरडे

मायकेल फॅरडे, नाव ऐकलं आणि कार्य पाहिलं की अंगावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही. लोहाराकडे काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा, कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण नसतांना लंडनमधल्या एका पुस्तक विक्रेत्याकडे काम करतो. हे काम करत असताना खूप सारी पुस्तकं वाचून स्वत:च काही गोष्टी शिकतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला ब्रिटनचा सर्वोच्च खिताब देण्यात येतो, जो तो स्वतः नाकारतो.

पुस्तकांच्या दुकानात जेन मार्सेटचं 'कन्वर्झेशन्स आॅन केमिस्ट्री' हे पुस्तक मायकेलच्या वाचनात येतं आणि रसायनशास्त्रानं तो भारावून जातो. त्याच वेळी लंडनमध्ये प्रसिद्ध ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ हंफ्री डेव्ही यांची व्याख्याने आयोजित केलेली असतात. कुणा एका व्यक्तीच्या मदतीने तो व्याख्यानांची तिकिटं मिळवतो आणि प्रभावित होऊन या व्याख्यानांच्या 300 पानांच्या नोट्स डेव्ही यांना पाठवतो. डेव्ही या नोट्स वाचून बाजूला ठेवतात पण साधारण एका वर्षभरानंतर एका प्रयोगादरम्यान हंफ्री डेव्ही यांना दृष्टीदोष होतो आणि मदतनीस म्हणून ते फॅरडेला बोलावतात. आपल्या ज्ञानाने आणि कामाने हळूहळू मायकेल त्यांचा विश्र्वास संपादन करतो.

मायकेल फॅरडे यांचं विद्युतचुंबकीय क्षेत्रातलं कार्य खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असलं तरी फॅरडे यांनी रसायनशास्त्राच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. 

फॅरडे क्लोरीनच्या अभ्यासामध्ये विशेषतः सामील होते; त्यांना क्लोरीन आणि कार्बनची दोन नवीन संयुगे सापडली होती. त्यांनी क्लोरीनचं द्रवीकरण केलं होतं त्याचबरोबर बेंझीन सारख्या रासायनिक पदार्थाचा शोधही लावला होता. त्यांनी वायूच्या प्रसारणाशी संबंधित अनेक प्राथमिक प्रयोग केले ज्याकडे जॉन डाल्टन यांनी प्रथम लक्ष वेधले होते.

फॅरडे अनेक द्रवरूप वायू तयार करण्यात यशस्वी झाले, आज आपण स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या द्रवरूप वायूच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं संशोधन मायकेल फॅरडे यांचं मानलं जातं. फॅरडे यांनी स्टीलच्या मिश्र धातुंची तपासणी केली आणि प्रकाशशास्त्राच्या अभ्यासासाठी अनेक प्रकारच्या काचेची निर्मिती केली.

आज जवळजवळ सर्व प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बन्सेन बर्नरची प्राथमिक आवृत्ती मायकेल फॅरडे यांनी बनवली होती. पुढे 1852 सारी हिडेल्बर्ग विद्यापिठाच्या प्रयोगशाळेतील बर्नरसाठी याच आवृत्तीत सुधारणा करून नवीन रचना रॉबर्ट बन्सेन यांनी बनवून दिली.

मायकेल फॅरडे यांनी विद्युत विलेपनासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या विद्युत अपघटनाचे नियम शोधून काढले त्याचबरोबर एनोड, कॅथोड, इलेक्ट्रोड आणि आयन, टेर सारख्या शब्दावली लोकप्रिय करण्यासाठी देखील त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.

1821 मध्ये डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ हॅन्स ओरेस्टेड यांना विद्युतचुंबकीय शक्तीचा शोध लागला. वाहत्या विद्युतधारेसोबत चुंबकीय शक्ती अस्तित्वात असते हे तर समजले होते पण याचा उपयोग कसा करून घ्यावा हे काही कळत नव्हते. हंफ्री डेव्ही यांनी ब्रिटिश शास्त्रज्ञ विल्यम हायड वुलस्टन यांच्या सहकार्याने विद्युत मोटर डिझाइन करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी झाले.

मायकेल फॅरडे यांनी अथक प्रयत्नानंतर या विद्युतचुंबकीय शक्तीचा वापर करून विद्युत जनित्र व विद्युत मोटर यांसारखी उपकरणे बनविली जी आज मोठ्या प्रमाणावर सर्वच क्षेत्रांमध्ये वापरली जातात.

एवढं कमी होतं की काय म्हणून प्रकाशाच्या अंगी सुध्दा चुंबकीय गुणधर्म असतात व बाह्य चुंबकीय बलामुळे प्रकाशाचा मार्ग बदलू शकतो (प्रकाशाचं धृवीकरण) यासारखं मुलभूत संशोधनही मायकेल फॅरडे यांनी केलं.

त्यांच्या आयुष्यात, विज्ञानातील त्यांच्या सेवांबद्दल त्याला नाईटहूड हा ब्रिटनचा सर्वोच्च किताब देण्यात आला पण  धार्मिक कारणास्तव त्यांनी त्याला नकार दिला. त्यांचा असा विश्वास होता की संपत्ती जमा करणे आणि ऐहिक प्रतिफळ मिळवणे हे बायबलच्या शब्दाच्या विरोधात आहे आणि त्यांनी "शेवटपर्यंत साधा श्री फॅराडे" राहणे पसंत केले.

अशा या महान शास्त्रज्ञाचा आज (दि. 25 आॉगस्ट) स्मृतीदिन त्याबद्दल त्यांना शतशः अभिवादन.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्...

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)