मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

राष्ट्रीय विज्ञान दिन

28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 1986 साली राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषदेच्या सुचनेवरून भारत सरकारने सर सी. व्ही. रामन यांच्या संशोधन प्रकल्प सादरीकरणाच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. 1987 साली परिषदेतर्फे विज्ञान संवाद व विज्ञान प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय विज्ञान प्रसार पुरस्कार जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी समाजामध्ये दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व रूजणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होणे, मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयत्न, धडपड व त्यांचे शोध यांच्या प्रदर्शनासाठी तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवं तंत्रज्ञान व नवीन आव्हाने यांची चर्चा करण्यासाठी, विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती आणि त्याचबरोबर विज्ञान प्रसार व प्रचारासाठी विज्ञान दिन साजरा केला जातो. 
दरवर्षी एखाद्या विशिष्ट विषयाला धरून  सार्वजनिक व्याख्याने, रेडिओ, टीव्हीवर विविध कार्यक्रम, विज्ञान विषयक चित्रपट, विज्ञान प्रदर्शनं, वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रकल्प स्पर्धा अशा अनेक माध्यमांतून विज्ञान दिन साजरा केला जातो. 2020 साली या दिवसाचा विषय होता 'विज्ञान क्षेत्रातील महिला'. युनेस्कोच्या सांख्यिकी संस्थेनुसार जगातील संशोधकांमध्ये महिलांची संख्या तीस टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे, भारतात हा आकडा 14 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी येतो. 1901 सालापासून प्रदान 923 नोबेल पारितोषिक विजेत्यांपैकी महिला फक्त 48 आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)