न्युटनचा गुरूत्वाकर्षणाचा नियम आपल्याला माहीत आहे. खूप वेळा आपण त्याचं गणितीय सूत्र वाचलेलं असतं पण यातील गुरूत्व स्थिरांक (G) म्हणजे काय? ते कशाचं मापन आहे आणि नेमकं ते का आणि कुठून आलं हे आपल्या लक्षात येतेच असं नाही. भौतिकशास्त्रातील जाणकारांना ते नक्कीच माहिती असेल तरीही...
गुरूत्व स्थिरांकाचे एकक हे [m3/(kg.s2)] आहे. यातील घनमीटर/किलोग्राम हा भाग घनतेचा व्यस्त आहे. घनता म्हणजे एखाद्या पदार्थाचा घट्टपणा मोजण्याचे एकक तर त्याचा व्यस्त म्हणजे त्या पदार्थाचा सैलसरपणा. यापुढील भाग म्हणजे 1/s2 हा तो पदार्थ किती लवचिक किंवा परिवर्तनशील आहे याचं मापन होय.
थोडक्यात गुरूत्वस्थिरांक हा कठल्यातरी पदार्थाच्या सैलसरपणाची परिवर्तनशीलता मोजतो. मग कुठला पदार्थ? असा प्रश्र्न येतो तेव्हा ज्या वस्तुंच्यामधलं गुरुत्वाकर्षण आपण मोजतो आहोत त्यांच्या आसपासचे अवकाश जे आपल्या माहितीप्रमाणे सतत प्रसरण पावते आहे.
म्हणजे गुरूत्व स्थिरांक हा अवकाशाच्या सैलसरपणाच्या परिवर्तनशीलतेचं (घनता व प्रसरण) मापन करतो हे आपल्या लक्षात येईल.
या गुरूत्व स्थिरांकाची किंमत काढण्यासाठी हेन्री कॅव्हेन्डीश यांनी एक खूप छान प्रयोग केलेला आहे, त्याबद्दल पुढच्या वेळी...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा