दरवर्षी 21 जून रोजी सुर्याचे दक्षिणायन सुरू होते. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे होणारे सुर्याचे भासमान भ्रमण यांस कारणीभूत असते. कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे सुर्य सरकतोय असा भास व्हायला सुरूवात होते. पृथ्वीवरील ऋतुचक्रासही ही घटना कारणीभूत ठरते. खरे तर वर्षातनं दोनदा अयन दिन असतात. एक म्हणजे 21 जून ज्या दिवशी कर्कवृत्तावरून सुर्याचे दक्षिणायन सुरू होते तर दुसरे म्हणजे 22 डिसेंबर ज्या दिवशी मकरवृत्तावरून सुर्याचे उत्तरायण सुरू होते. पण याच दिवशी म्हणजे अयन दिनाच्या दिवशी सुर्यग्रहण होणे ही तशी काही नेहमीची घटना नाही.
सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...
छान उत्तम उपक्रम - डोक्याला चांगला खुराक आहे
उत्तर द्याहटवा