मूलभूत विज्ञानात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने एम. एससी. (भौतिकशास्त्र/गणित किंवा संख्याशास्त्र /रसायनशास्त्र/जीवशास्त्र {वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री}) किंवा एम.ए.(गणित/संख्याशास्त्र) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विज्ञान परिषद एक शिष्यवृत्ती योजना राबवत आहे. शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक विषयातील दोन विद्यार्थांची निवड करण्यात येईल. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.
https://www.mavipamumbai.org/
https://www.mavipamumbai.org/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा