मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

रिचर्ड फाईनमन यांच्या पुस्तकातून साभार....

एका पुस्तकात चार चित्रांनी सुरुवात केलेली होती. पहिले एक चावी भरलेले खेळणे होते आणि मग एक मोटारीचे चित्र होते. तिसऱ्यात एक मुलगा सायकल चालवत होता आणि चौथ्यात असेच काहीतरी होते.प्रत्येक चित्राखाली एकाच प्रश्न होता... हे सारे कश्यामुळे होते?
मला वाटले, मला माहित आहे की, ते आता यंत्रे आणि त्यांचे शास्त्र याबद्दल बोलणार आहे. त्या खेळण्यात भरलेल्या चाविमुळे कसे ते खेळणे फिरते... किंवा रसायनशास्त्र, मोटारीचे इंजिन कसे पेट्रोलमुले चालते आणि जीवशास्त्र... म्हणजे स्नायू कसे काम करतात.
माझे वडील असते तर ते अश्याच पद्धतीने मला शिकवत असते! हे सारे कशामुळे चालते? हे सारे चालते कारण सूर्य सतत चमकत असतो... मग त्यावर आम्ही चर्चा करत राहिलो असतो... शिकण्या शिकवन्यातली गम्मत सानुभावली असती.
"नाही, हे खेलाने हलते कारण आतली स्प्रिंग चावी भरून गुंडाळलेली आहे," मी म्हणालो असतो.
"आता ती स्प्रिंग कशी गुंडाळली गेली...?"
"मी चावी फिरवली म्हणून गुंडाळली."
"आणि तू कशामुळे फिरवू शकलास?"
 "कारण मी अन्न खाल्ले होते."
आता अन्न तयार होते ते झाडांमुळे अन त्याचे कारण सूर्य प्रकाश देतो हे आहे... सूर्य चमकत असतो म्हणून सारे काही हलू शकते. असे सांगितल्याने कोणतीही हालचाल हि सूर्याच्या उर्जेतील बदलामुळे होत असते, हा विचार मुलांच्या मनात रुजतो.
मी पान उलटले. या चारही चित्रा खालच्या प्रश्नाचे उत्तर होते, खेळणे हलते कारण त्याला उर्जा पुरवलेली असते, सायकल चालवणाऱ्या मुलासाठीही ऊर्जेमुळे सायकल फिरते सर्वांसाठी एकाच उत्तर ऊर्जेमुळे ही सारी चालतात. याचा अर्थ काहीच होत नाही. एक नाव शब्द मुले शिकतात उर्जा... या ऐवजी वाकालीक्स असा शब्द असता तर वाकालीक्समुले सारे हलते असे उत्तर असते. मुलाला काही शिकता येत नाही... ते फक्त एक नवा शब्द शिकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)