मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Science Aptitude Test

आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस: 30 जून

आपल्या शालेय पुस्तकांमध्ये आपण लघुग्रहांबद्दल वाचलेलं असतं. बऱ्याचदा कुठेतरी उल्कापात झाल्याचं आपण ऐकत असतो. लघुग्रह, उल्का, अशनी इत्यादींबाबत आपल्या मनात कुतूहल असतं पण एकप्रकारची अनामिक भितीसुध्दा असते. जर आपल्याला त्याबद्दल योग्य माहिती नसेल तर ही भिती बऱ्याच अंधश्रद्धांना जन्म देण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे लघुग्रहांबाबतची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, लघुग्रहाच्या संकटाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी 30 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस' म्हणून साजरा केला जातो. डिसेंबर २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं ३० जून हा दिवस 'जागतिक लघुग्रह दिवस' म्हणून घोषित केला. ३० जून ही तारीख 'तुंगुस्का' घटनेची आठवण म्हणून निवडली गेली. रशियातील सायबेरियामध्ये असलेल्या तुंगुस्का नदीच्या किनाऱ्यावरील दाट वनक्षेत्रामध्ये ३० जून १९०८ रोजी सकाळी एक जळती उल्का पडली होती. उल्कापात झाल्यामुळे २,१५० चौरस किलोमीटर वन परिसरातील ८ कोटी झाडं नष्ट झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत संशोधकांना याचं रहस्य उलडगडता आलं नाहीय. याशिवाय आतापर्यंत याबाबत कुणालाही माहित