विद्यार्थी मित्रहो विज्ञान आणि गणित आणि स्पेस सायन्सचा पाया पक्का करणारी एक अभिनव परीक्षा म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेकडे आज महाराष्ट्रात बघितले जाते. महाराष्ट्राच्या नंदुरबार गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल भागापासून मुंबई-पुण्यासारख्या आर्थिक संपन्न भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानाची ही चळवळ आज घराघरात पोहोचलेली आहे. एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर निस्सीम श्रद्धा असणारी पिढी महाराष्ट्रात उभी राहत आहे. अगदी बालपणापासून विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स,रॉकेट सायन्स याबद्दल विशेष गोडी वाटते.चांद्रयान व मंगळयान यासारख्या इस्त्रोच्या मिशन सर लहान मुलं सुद्धा अगदी प्रेरित होऊन चर्चा करतात,अभ्यास करतात.अतिशय लहान वयात बहुतांश विद्यार्थ्यांना ऍस्ट्रोनॉट होण्याचे स्वप्न पडते.मात्र ऍस्ट्रोनॉट होण्यासाठी नेमकं काय लागतं ? याची माहिती मात्र कोणी देत नाही.भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इसरो म्हणजे विद्यार्थ्यांना अप्रूप वाटते.अवकाशयात्री होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इसरो म्हणजे साक्षात पर्वणी नाही का ? या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वयातच इस्रो, आयआयटी यासारख्या उच्च ...

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.