मुख्य सामग्रीवर वगळा

Nobel Science Talent Search (NSTS) परीक्षा

विद्यार्थी मित्रहो विज्ञान आणि गणित आणि स्पेस सायन्सचा पाया पक्का करणारी एक अभिनव परीक्षा म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेकडे आज महाराष्ट्रात बघितले जाते. महाराष्ट्राच्या नंदुरबार गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल भागापासून मुंबई-पुण्यासारख्या आर्थिक संपन्न भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानाची ही चळवळ आज घराघरात पोहोचलेली आहे. एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर निस्सीम श्रद्धा असणारी पिढी महाराष्ट्रात उभी राहत आहे. अगदी बालपणापासून विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स,रॉकेट सायन्स याबद्दल विशेष गोडी वाटते.चांद्रयान व मंगळयान यासारख्या इस्त्रोच्या मिशन सर लहान मुलं सुद्धा अगदी प्रेरित होऊन चर्चा करतात,अभ्यास करतात.अतिशय लहान वयात बहुतांश विद्यार्थ्यांना ऍस्ट्रोनॉट होण्याचे स्वप्न पडते.मात्र ऍस्ट्रोनॉट होण्यासाठी नेमकं काय लागतं ? याची माहिती मात्र कोणी देत नाही.भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इसरो म्हणजे विद्यार्थ्यांना अप्रूप वाटते.अवकाशयात्री होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इसरो म्हणजे साक्षात पर्वणी नाही का ? या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वयातच इस्रो, आयआयटी यासारख्या उच्च तंत्रज्ञान शिक्षण संस्थांना सहलीला जाण्यासाठी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा एक हक्काचा पासवर्ड बनलेली आहे. या परीक्षेमध्ये सहभागी होऊन आत्तापर्यंत दोनशेहून अधिक विद्यार्थी इस्रोच्या सहलीसाठी पात्र ठरलेले आहेत.आपणही या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवून इस्रोला जाऊ शकतात त्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा. ■ NSTS – 2022 परीक्षा द्या आणि इस्रो, IIT IIM येथे अभ्यास सहलीला जा ……… ____________________________________ नोबेल विज्ञान प्रसारक बहुद्देशीय संस्था आयोजित ● NOBEL SCIENCE TALENT SEARCH EXAM ____________________________________ ◆ परीक्षा दिनांक- 17 जुलै 2022 (पात्रता परीक्षा) ◆ वेळ – 2 तास( ऑनलाइन) ◆ ऍडव्हान्स लेव्हल – सप्टेंबर 2022( लेखी ) ____________________________________ वयोगट – ● गट अ – 5 वी ते 7 वी ● गट ब -8 वी ते 10 वी ● गट क- 11वी,12वी डिप्लोमा __________________________________ ■ अभ्यासक्रम- 👉 गट अ- 5 वी ते 7 वी _(विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_ 👉 गट ब – 8 वी ते 10 वी _( विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_ 👉 गट क – 11 वी ते 12 वी,डिप्लोमा _( Physics,chem,Bio of 11 +विज्ञानातील GK+ तंत्रज्ञान)_ ____________________________________ ■ परीक्षा शुल्क- ● गट अ- 270 ₹ ● गट ब – 360 ₹ ● गट क- 360 ₹ गट अ- 5 वी ते 7 वी गट ब - 8 वी ते 10 वी गट क - 11 वी ते 12 वी,डिप्लोमा बक्षिसे 👉 गुणवत्ता यादीतील 50 विद्यार्थ्यांना ISRO, IIT, IIM येथे अभ्यास सहल 👉 NSTS- 2022 परीक्षेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र 👉 ऍडव्हान्स लेव्हल 2022 पात्र ठरणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक पुस्तके भेट 👉 10 वीच्या विद्यार्थ्यांना IIT -JEE, NEET परीक्षांचे कोर्सेस साठी 1 लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप अधिक माहितीसाठी संपर्क https://nsts.nobelfoundation.co.in/ ____________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

मोबाईलची बॅटरी 100% झाल्यावर चार्जिंगला लावून ठेवली तर काय होते?

“मोबाईलची बॅटरी 100% झाली आहे, आता चार्जर काढ!” आपण घरात ही सूचना अनेकदा ऐकतो. पण खरंच 100% चार्ज झाल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला तर बॅटरी खराब होते का? मोबाईलचा स्फोट होऊ शकतो का? की आधुनिक मोबाईल स्वतःच चार्जिंग नियंत्रित करतात? चला, या रोजच्या जीवनातील प्रश्नामागचे विज्ञान समजून घेऊया!  सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट... आजच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन (Lithium-ion) किंवा लिथियम-पॉलिमर (Lithium-polymer) बॅटरी वापरली जाते. या बॅटरीमध्ये चार्जिंगचे नियंत्रण करणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असते. त्यामुळे बॅटरी 100% झाल्यानंतर चार्जर पूर्वीसारखा सतत मोठ्या प्रमाणात विद्युतप्रवाह बॅटरीमध्ये ढकलत राहात नाही. म्हणजेच— “100% झाल्यावरही बॅटरीमध्ये सतत वीज भरत राहते” — हे योग्य नाही. मात्र याचा अर्थ 100% चार्ज झाल्यावर मोबाईल कायम चार्जिंगला ठेवणे पूर्णपणे चांगले आहे, असेही नाही. मग नेमके काय होते? 100% झाल्यावर चार्जिंग कसे नियंत्रित होते? मोबाईलमध्ये बॅटरीचे तापमान, व्होल्टेज आणि चार्जची स्थिती तपासणारी Battery Management System (BMS) किंवा संबंधित चार्जिंग नियं...

नील्स बोर- जन्मदिवस- ७ ऑक्टोबर १८८५.

नील्स बोर हे एक डेन्मार्कचे भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणुसंरचना आणि पुंजवाद समजून घेण्यासाठी मूलभूत योगदान दिले, ज्यासाठी त्यांना १९२२ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बोर हे एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तकही होते. संशोधन बोर यांनी अणूचे एक नवीन प्रारूप मांडले, ज्यात त्यांनी अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे एकाच नव्हे तर अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये. या कक्षांची ऊर्जापातळी मात्र स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत ऊडी मारतो किंवा त्याची ठराविक ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत उडी मारतो.  घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे (सोडिअम क्लोराइडचे) कण टाकल्यावर  त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात  सोडिअम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून  पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडिअम व्हेपर  दिव्यांमधूनही त्...