आयझॅक आसिमॉव्ह यांचं विज्ञानाशी संबंधित लिखाण हे जगप्रसिद्ध आहे. विज्ञानातील संकल्पना अगदी सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगंं आहेच पण वैज्ञानिक कथांच्या माध्यमातून वाचकांना खिळवून ठेवण्याचं सुद्धा सामर्थ्य त्यांच्या लिखाणात आहे. त्यांच्या रोबोटिक्सशी संबंधित शंभराहून अधिक कथा प्रकाशित आहे पण रोबोटिक्स सोडूनही काही उत्कृष्ट कथा त्यांनी लिहिलेल्या आहे, त्यातील एका कथेबाबत कथेचा काळ हा लिखाणाच्या काळाशी मिळता जुळता आहे. फेब्रुवारी 1958 साली प्रकाशित या कथेत पृथ्वीवरील मानवाने अणुंच्या विभाजनाचे तंत्र आत्मसात केलं आहे पण अवकाशगमनाचं तंत्र मात्र त्याच्या हातात नाही. एका दीर्घायू राजन्य जमातीतील नॅरोन या दीर्घिका निबंधकाचे अवकाशातील तारा मंडळातील जमातीच्या नोंदी ठेवणे तसेच त्यांचं बुध्दीमान व प्रगल्भ या गटांत वर्गीकरण करणे हे काम असतं. जेव्हा त्याला पृथ्वीवरील मानव जमातीच्या अणुंच्या विभाजनाचे तंत्रज्ञान कळते तेव्हा तो मानवजातीच्या पुढे बुध्दीमान लिहतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की यांना अवकाशगमनाचं तंत्र अवगत नाही आणि यांनी स्वतःच्या ग्रहावरच अणुचाचणी केली आहे ते...

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.