सुर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईज धूमकेतू पुन्हा पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागलाय. सध्या सोशल मीडियावर या धुमकेतूची खूप चर्चा सुरू आहे. हा धुमकेतू कसा पाहायाचा? तो साध्या डोळ्यांना दिसेल का? असे अनेक प्रश्न सध्या नेटीझन्स एकमेकांना विचारत आहेत. याच काही प्रश्नांची उत्तरं आम्ही पुढे दिली आहेत. 14 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंतचे 20 दिवस हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी महाराष्ट्रासह संपूर्ण पृथ्वीवासियांना लाभणार आहे. सुर्यास्तानंतर वायव्य दिशेला म्हणजेच उत्तर - पश्चिमेच्या आकाशात हा धूमकेतू पाहता येईल. सध्या देशात मान्सूनचं आगमन झाल्याने निरभ्र आकाश सापडणं दुर्मिळ आहे. मात्र, ही संधी उपलब्ध झाली तर हा दुर्मिळ धूमकेतू पाहणं सोडू नका. कारण, या 20 दिवसानंतर पुढची काही हजार वर्षं हा धूमकेतू दिसणार नाही. त्या आधी धूमकेतू म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊयात. धूमकेतू म्हणजे काय? धूमकेतू हे आपल्या सूर्यमालेचेच घटक असतात. 1997 साली आलेला हेल-बॉप हा धूमकेतू सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यानंतर 2007 मध्ये मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून ...

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.