बऱ्याच जणांना गणित आवडत नाही पण गणितात खूप गमती जमती असतात. आज अशाच काही गमती आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या गमती काही विशिष्ट आकड्यांशी आणि एका व्यक्तीशी संबंधित आहेत. त्या व्यक्तीचं नाव दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर. हो बरोबर ऐकलंत तुम्ही, अगदी बरोबर! एक भारतीय, त्यातल्या त्यात मराठी आणि जागतिक स्तरावरील प्रसिद्ध गणिती. हे नाव खूप कमी लोकांना माहिती असेल कारण आमच्याकडे सर्व काही होतंच्या नादात खरंच जे काही होतं किंवा आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. चला तर मग सुरू करूयात एक चार अंकी संख्या मनात धरा जी वेगवेगळ्या अंकांची बनलेली आहे. उदा. 1234, 5961, 1937 किंवा 7391. आपण 1234 घेऊयात. आता ती अंकांच्या उतरत्या क्रमात लिहू- 4321 पुन्हा ती अंकांच्या चढत्या क्रमात लिहू- 1234 आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू - (4321-1234= 3087) आलेले उत्तर अंकांच्या उतरत्या क्रमात लिहू- 8730 परत त्या संख्येला चढत्या क्रमात लिहू - 0378 आता मोठ्या संख्येतून लहान संख्येला वजा करू - (8730 - 378 =8352) आलेले उत्तर अंकांच्या उतरत्या क्रमात लिहू - 8532 आता आलेले उत्तर अंकांच्या चढत्या क्रमात लिहू - 2358 परत म...

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.