सूर्याभोवती गोलाकार इंद्रधनुष्य दिसणे म्हणजे पर्वणीच. कालच्या सुर्यग्रहणानंर आज सकाळी आडगांव ता. भोकरदन जि. जालना येथून हे दृश्य दिसले. अशाप्रकारचे दृश्य ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांमधून होणार्या प्रकाशाच्या अपस्करणानंतर दिसून येते. इंग्रजीत याला हॅलो असे म्हणतात. सिरस किंवा सिरोस्ट्रॅटस या प्रकारच्या ढगांमध्ये मुख्यतः बर्फाची स्फटिकं असतात, या षटकोनी आकाराच्या स्फटिकांमधून प्रकाश जात असताना, तो 22 ° कोनात वाकलेला असतो या स्फटिकांमधून बाहेर पडताना या प्रकाशाचे अपस्करण होऊन सूर्याभोवती गोलाकार प्रभामंडप तयार करतो. या विशिष्ट प्रकारच्या इंद्रधनुष्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे यामधील रंगाचा क्रम हा साधारण इंद्रधनुष्यातील रंगांच्या अगदी उलट असतो. या इंद्रधनुष्याच्या आतील बाजूस लाल रंग तर बाहेरील बाजूस जांभळा रंग असतो. या रंगक्रमाच्या उलट होण्यामागे बर्फाच्या स्फटिकांतर्गत दोनदा होणारे प्रकाशाचे परावर्तन हे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात हवामानाच्या अंदाजासाठी यांचा उपयोग होत असे. असं सांगितलं जातं की या प्रकारचा प्रभामंडप म्हणजे पावसाची नांदी होय. य...
विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.