एकेकाळी बहुतेक सर्वजण मानत असे की पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी असून इतर सर्व ग्रह आणि तारे पृथ्वीभोवती फिरतात. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला या मान्यतेला धक्का देणारी एक हस्तपुस्तिका पोलंडमध्ये जन्मलेल्या मिकोलाज कोपर्निक ज्याला आपण आज निकोलस कोपर्निकस म्हणून ओळखतो याने स्वतः लिहून आपल्या मित्रांना वाटली. या हस्तपुस्तिकेत त्याने विश्वाची रचना मांडली ज्यामध्ये सूर्य हा विश्वाच्या केंद्रस्थानी तर इतर ग्रह आणि तारे सूर्याभोवती फिरतात. ही रचना पूर्णपणे बरोबर नसली तरी खागोलांच्या गतीबद्दल मानवाची समज वाढवण्यासाठी पुढील शास्त्रज्ञांसाठी ही पुस्तिका महत्वाची संदर्भ ठरली. चर्चला मात्र ही भूमिका मान्य नव्हती कारण चर्चच्या मते पृथ्वी आणि मानव सर्व विश्वात श्रेष्ठ आहे त्यामुळे सर्व विश्व हे पृथ्वीभोवतीच फिरलं पाहिजे. या हस्तपुस्तिकेतील रचना आणि स्वतः केलेली निरीक्षणे या आधारावर गॅलिलिओ आयुष्यभर चर्चसोबत भांडू शकला पण चर्चने कोपर्निकसला नेहमी खोटेच ठरवले. त्याच्या मृत्युनंतर कितीतरी वर्षांनी गॅलिलिओचे म्हणणे चर्चने सुद्धा मान्य केले की "कोपर्निकसच बरोबर आहे" आज 24 मे, निकोलस कोप...

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.