मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

निळा न दिसणारा निळा चंद्र

चंद्र निळा कधी असतो का? असा प्रश्न विचारला तर आपण म्हणू की काहीही हं! असं कधी असतं का?

बरोबर आहे, कारण साधारणपणे दररोज आपण चंद्र बघत असतो आणि नेहमी तो पांढरा दिसतो. कधीतरी लाल रंगाची छटा दिसली की तो प्रकाशाचा परीणाम आहे असे आपण म्हणतो.

मग 2021 वर्षीच्या नारळी पौर्णिमेच्या चंद्राला निळा चंद्र ( ब्ल्यू मून) म्हणत होते. असे का? नासाच्या म्हणण्यानुसार तर निळा चंद्र दर दोन-तीन वर्षांनी होणारी खगोलीय घटना आहे. 

चला तर मग समजून घेऊया की हा नेमका प्रकार आहे. चंद्र हा पृथ्वीभोवती 29.5 दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. म्हणजे साडेएकोणतीस दिवसांनी पौर्णिमा येते आणि संपूर्ण चंद्र आपल्याला दिसतो. या साडेएकोणतीस दिवसांचा एक चांद्रमास (महिना) असतो. यावरून आपण असे मानतो की एका वर्षात बारा पौर्णिमा असतील पण चांद्रवर्ष केवळ 354 (29.5×12) दिवसांचेच असते. त्यामुळे दोन ते तीन वर्षांनी एका कॅलेंडर वर्षात एक चांद्रमास शिल्लक येतो म्हणजे एक पौर्णिमा जास्त (यालाच कदाचित अधिक मास असेही म्हणतात)

यामुळे एका कॅलेंडर वर्षात आलेल्या या अधिकच्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून म्हणतात. एका कॅलेंडर महिन्यात आलेला दुसरा चंद्र म्हणजे निळा चंद्र.

पण खरेच कधी चंद्र निळ्या रंगाचा दिसू शकतो का?

तर हो! पण हे खूप दुर्मिळ आहे. 1883 साली इंडोनेशियातील क्राकाटोआ बेटावरील ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी खूप मोठ्या प्रमाणावर राख, धूळ निर्माण झाली आणि ती आकाशात 50 मैलांवर गेली. या राखेतील एक मायक्रोमीटर आकाराच्या कणांनी चंद्रप्रकाशातील लाल रंगांचे विकीरण घडवून आणले आणि त्यामुळे चंद्रप्रकाशाची हिरवी निळी छटा दिसली.

नासाच्या माहितीनुसार 1983 मध्ये मेक्सिकोमधील एल चिचॉन ज्वालामुखीचा उद्रेक, 1980 मध्ये माउंट सेंट हेलेन्स आणि 1991 मध्ये माउंट पिनाटूबोचा उद्रेक यावेळी सुध्दा असा 'खरा निळा चंद्र' दिसून आला होता. पण हे खूप दुर्मिळ आहे, इंग्रजीतील एक म्हण आहे 'Once in a Blue moon' त्याप्रमाणे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्...

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)