एका पुस्तकात चार चित्रांनी सुरुवात केलेली होती. पहिले एक चावी भरलेले खेळणे होते आणि मग एक मोटारीचे चित्र होते. तिसऱ्यात एक मुलगा सायकल चालवत होता आणि चौथ्यात असेच काहीतरी होते.प्रत्येक चित्राखाली एकाच प्रश्न होता... हे सारे कश्यामुळे होते? मला वाटले, मला माहित आहे की, ते आता यंत्रे आणि त्यांचे शास्त्र याबद्दल बोलणार आहे. त्या खेळण्यात भरलेल्या चाविमुळे कसे ते खेळणे फिरते... किंवा रसायनशास्त्र, मोटारीचे इंजिन कसे पेट्रोलमुले चालते आणि जीवशास्त्र... म्हणजे स्नायू कसे काम करतात. माझे वडील असते तर ते अश्याच पद्धतीने मला शिकवत असते! हे सारे कशामुळे चालते? हे सारे चालते कारण सूर्य सतत चमकत असतो... मग त्यावर आम्ही चर्चा करत राहिलो असतो... शिकण्या शिकवन्यातली गम्मत सानुभावली असती. "नाही, हे खेलाने हलते कारण आतली स्प्रिंग चावी भरून गुंडाळलेली आहे," मी म्हणालो असतो. "आता ती स्प्रिंग कशी गुंडाळली गेली...?" "मी चावी फिरवली म्हणून गुंडाळली." "आणि तू कशामुळे फिरवू शकलास?" "कारण मी अन्न खाल्ले होते." आता अन्न तयार होते ते झाडांमुळे अन त्याचे ...

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.