आपली पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नाचे उत्तर आज आपण अगदी सहजपणे देऊ शकतो कारण आपण अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो आज आपल्याकडे आहे, पण पूर्वीच्या काळी हे एवढं सोपं नक्कीच नव्हतं. त्यांच्याकडे कोणतीही आधुनिक साधनं किंवा साहित्य नव्हतं तरी पण त्यांची निरीक्षणं आणि वैज्ञानिक प्रयोग करण्याचं कसब मात्र उत्तम होतं. चला तर मग कसं त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मिळवलं ते जाणून घेऊया आजच्या गोष्टीतून पृथ्वीचा आकार गोल आहे हे लक्षात येण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून कमीत कमी 35000 फूट उंचीवरून निरीक्षण करणे आवश्यक आहे किंवा समुद्रप्रवासाने गोलाकार पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत त्याठिकाणी येणे आवश्यक आहे. प्राचीन काळी एवढ्या उंचीवर पोहचण्याचे अज्ञात तंत्रज्ञान आणि समुद्र प्रवासाची भीती यामुळे आपल्या सभोवतालीचे जग हे सपाट आणि स्थिर असल्याचा समज निर्माण झाला. सूर्य आणि चंद्राचे पृथ्वीभोवती फिरतांना दिसणे यामुळे हा समज आणखी दृढ होत गेला. प्राचीन ग्रीक लोकांना मात्र पृथ्वी गोलाकार आहे याबद्दल कुठलीही शंका नव्हती याचे कारण त्यांनी केलेली निरीक्षणे, त्यांना असलेलं विज्ञान आणि गणिताचं ज्ञान हे होतं....

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.