पोलिओच्या महामारीतून जगाला वाचवणाऱ्या महामानवाचा म्हणजेच जोनास एडवर्ड साल्क यांचा आज जन्मदिवस. 1914 साली अमेरिकेत निर्वासित ज्यु दांपत्य डॅनियल आणि डोरा यांच्या पोटी जन्मलेल्या साल्क यांनी 1955 साली पोलिओ वरील लसीचा शोध लावला. साल्क यांनी शोधलेली लस (आयपीव्ही) मारलेल्या किंवा निष्क्रीय, पोलिओ विषाणूच्या 1, 2 आणि 3 प्रकारावर आधारित आहे. 1950 च्या दशकात पोलिओच्या साथीचा प्रादुर्भाव मोडून काढण्यासाठी आयपीव्ही ही पहिली लस होती. हे इंजेक्शनद्वारे दिले जाते आणि रक्तप्रवाहातून प्रसारित केले जाते, जिथे ते सक्रिय प्रतिजैविकांची निर्मिती करते. पोलिओ हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा विषाणू मज्जासंस्थेवर आक्रमण करतो आणि काही तासांतच पूर्णपणे अर्धांगवायू होऊ शकतो. हा विषाणू प्रामुख्याने मल-मौखिक मार्गाद्वारे किंवा काही वेळा दूषित पाणी किंवा अन्नातून आतड्यांमध्ये स्थिरावतो. पोलिओ उपसर्गाच्या 90 टक्के पेशंटमध्ये काहीच लक्षणे दिसून येत नाही. परंतू विषाणूंनी रक्तामध्ये प्रवेश केल्यास ताप, थकवा, डोकेदुखी, उलट्या, मानेचा ताठरपणा आणि अंगदुखी ही सुरुवातीची लक्षणे दिसतात. मध्यवर्ती मज्जासंस्...

विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विज्ञान विषयक जुन्या नव्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयोग, शास्त्रज्ञ, विविध विज्ञानकथा व वैज्ञानिक पुस्तकांबद्दल माहिती, याचबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांनी आनंदाने विज्ञान शिकावं यासाठी कृतीतून विज्ञान, विज्ञानकोडी, ओळखा पाहू यांसारखी विशेष पृष्ठे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहिलेला ब्लॉग. आणखी एक नवीन पृष्ठ- विज्ञान कविता आणि गीतं.